Shoyeb Aftab (Photo Credit - You Tube)

NEET Result 2020 Topper: देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षा 2020 चा निकाल आज जाहीर झाला आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी या निकालाच्या परीक्षेत होते. नीट परीक्षेत ओडिशामधील शोएब आफताब (Shoyeb Aftab) ने 720 पैकी 720 गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे शोएबने निकाल लागण्यापूर्वी परीक्षेत 720 गुण मिळणार असल्याचा दावा केला होता. अखेर आज शोएबचा दावा खरा ठरला असून त्याने या परीक्षेत पैकीच्या-पैकी गुण मिळवले आहेत.

ओडिशाचा रहिवासी शोएब आफताबने राष्ट्रीय चाचणी एजन्सीने जाहीर केलेल्या अॅन्सर की नुसार, परीक्षेत पहिला क्रमांक मिळवणार असल्याचा दावा केला होता. शोएब कोटा येथील एलन कोचिंग संस्थेत शिकतो. शोएबने केलेल्या दाव्याला त्याच्या कोचिंग क्लासच्या संस्थेनेही पाठिंबा दर्शविला होता. शोएब ओडिशातील नीट परीक्षेत अव्वल असलेला तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. (हेही वाचा - NEET 2020 Merit List: नीट युजी परीक्षा निकाल आणि AIR Merit List कशी पहाल ntaneet.nic.in वर ऑनलाईन)

शोएबने सांगितलं की, त्याला शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोर जाव लागलं. शोएबचे वडिल चहा व्यापारी आहे. शोएब आठवीत असताना त्याच्या वडिलांचे मोठं नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत त्याला कोटो संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली. मात्र, 11 वी मध्ये त्याला चांगले गुण मिळाले नव्हते.

शोएबने अभ्यासाचं योग्य व्यवस्थापन करून अभ्यासाला सुरूवात केली. शोएब कॉलेजमधून आपल्या कोचिंग क्लासेसला जात असे. त्याचा दिवस साधारण 6 वाजता सुरू होत असे आणि संध्याकाळी 7 वाजता संपत असे. त्यानंतर, तो स्वत: 2 ते 3 तास आत्म-अध्ययन करायचा. विद्यार्थी त्यांचा निकाल ntaneet.nic.in आणि nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात.