NEET, JEE Main 2020 Exam Date: जेईई, नीट 2020 परीक्षा पुढे ढकलली, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी जाहिर केले वेळापत्रक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी राष्ट्रीय इंजिनिअरिंग आणि मेडिकल प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. त्याचसोबत परीक्षासंदर्भात नव्या तारखांची सुद्धा घोषणा केली आहे. जेईई मुख्य आणि अॅडवान्स परीक्षेसह NEET 2020 परीक्षा येत्या सप्टेंबर 2020 मध्ये आयोजित करण्यात येणारआहे. JEE Main परीक्षा 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. तर JEE अॅडवान्स परीक्षा 27 सप्टेंबरला आणि NEET 2020 परीक्षा येत्या 13 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे.(JEE, NEET Exams 2020 घेण्याबाबत HRD Ministry ने बनवली खास समिती; उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश) 

खरंतर मानव संसाधन विकास मंत्रालयाने NTA चे प्रमुख विनित जोशी यांच्या अध्यक्षतेखालील विशेषज्ञांच्या पॅनलकडून एक रिपोर्ट मागवला होता. त्यानुसार या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात एनईईटी आणि जेईईची परीक्षा आयोजित करण्याचे सुचविले होते. कोरोना व्हायरसचे देशातील संकट आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता पाहता आता पुढे ढकलली आहे.(Goa Board HSSC Result 2020: गोवा बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; gbshse.gov.in वर कसा पाहाल ऑनलॉईन रिझल्ट)

दरम्यान, रमेश पोखरियाल यांनी गुरुवारी असे म्हटले होते की, जेईई आणि एनईईटी परीक्षांच्या विद्यार्थ्यांसह पालकांकडून सध्याची परिस्थिती पाहता परीक्षेसाठी विरोध केला होता. डीजी एनटीए आणि अन्य विशेषज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सध्याची परिस्थिती पाहून मानव संसाधन विकास मंत्रालयाला रिपोर्ट करणार आहे.