Goa Board 12th Result 2020: गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12 वी चा निकाल हा 26 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला आहे. गोवा बोर्डातील 12 वीचे विद्यार्थी आपला निकाल गोवा बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट gbshse.gov.in वर पाहु शकतात. यंदाच्या वर्षी 12 वीच्या परीक्षेला 18,121 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 4,519 विद्यार्थी हे आर्ट्सचे असून 5,582 विद्यार्थी कॉमर्स तर 5,107 विद्यार्थी सायन्स शाखेतील आहेत. तर व्होकेशनल कोर्सेसमधील 2,913 विद्यार्थी आहेत.
यंदाच्या गोवा बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 9,317 मुली असून मुलांची संख्या 8,804 इतकी आहे. राज्यातील 17 वेगवेगळ्या परीक्षा केंद्रात 12 वीच्या परीक्षा पार पडल्या आहेत. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर 29 जून रोजी मार्कशिट्स महाविद्यालयांना पाठवण्यात येतील आणि 7 जूलै रोजी विद्यार्थीं आपल्या शाळा-महाविद्यालयातून निकाल घेऊ शकतील. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 20 मार्च पासूनचे पेपर्स पुढे ढकलण्यात आल्या होते. ते पेपर्स 20-22 मे दरम्यान घेण्यात आले.
गोवा बोर्डाचा 12 वी चा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?
# गोवा बोर्डाची अधिकृत वेबसाईट gbshse.gov.in ला भेट द्या. या वेबसाईटमध्ये निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईटच्या लिंक्स देण्यात आल्या आहेत.
# वेबसाईटच्या होमपेजवर HSSC Results 2020 यावर क्लिक करा.
# नवीन पेज ओपन होईल. त्यावर तुमचा रोल नंबर टाका आणि सब्मिट बटण प्रेस करा.
# तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.
SMS च्या माध्यमातूनही विद्यार्थी आपले निकाल पाहू शकतात. त्यासाठी RESULTGOA12 असं टाईप करुन 56263 वर पाठवा. मेसेजमध्ये रोल नंबर लिहिताना स्पेस देण्याची गरज नाही. दरम्यान गेल्या वर्षी गोवा बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षेला 16952 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 89.59% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.