JEE-Main 2024 च्या इंजिनियरिंग प्रवेश परीक्षा सेशन 1 चा निकाल (JEE-Main 2024 Result) जाहीर झाला आहे. यामध्ये 23 विद्यार्थ्यांना 100 चा परफेक्ट स्कोअर मिळवता आला आहे. यंदाच्या निकालामध्ये तेलंगणा मधील विद्यार्थ्यांनी माजी मारली आहे. या परिक्षेच्या पहिल्या सीझन मध्ये सुमारे 11.70 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. भारतातील 13 प्रादेशिक भाषांमध्ये आता ही परीक्षा घेतली जाते. आज हा यंदा घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईट वर पहाता येणार आहे. दरम्यान सत्र 2 च्या परीक्षेसाठी नोंदणी विंडो 2 मार्च 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांसाठी खुली आहे.
कसा पहाल JEE Main 2024 निकाल?
निकाल पाहण्यासाठी jeemain.nta.ac.in या अधिकृत वेबसाईट वर क्लिक करा.
त्यानंतर होमपेजवर JEE Main 2024 Result link वर क्लिक करा.
आता तुमचा application number, जन्मतारीख अथवा पासवर्ड टाका आणि लॉग इन करा.
आता लॉग ईन केल्यानंतर तुमचं स्कोअर कार्ड दिसेल
आता डाऊनलोड बटण वर क्लिक केल्यानंतर तुम्हांला तुमचा निकाल/ स्कोअरकार्ड डाऊनलोड करता येणार आहे. त्याची प्रिंट देखील घेता येईल.
आजच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सेशन 1 च्या निकालानंतर बी आर्क, बी प्लॅनिंग यांचा समावेश आहे त्यांचे देखील निकाल जाहीर केले जाणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी JEE Main marks आणि percentile predictions यामध्ये तफावत असल्याची तक्रार बोलून दाखवली होती मात्र एनटीएने त्यांच्या या तक्रारी फेटाळून लावत percentile calculation मध्ये चूक नसल्याचं स्पष्ट केले आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या जेईई मुख्य परीक्षा- सत्र एकचा निकाल जाहीर. #JEEMains2024 #jeemains2024results pic.twitter.com/JuTVLCDEuH
— AIR News Pune (@airnews_pune) February 13, 2024
'काही विद्यार्थ्यांनी Answer Key बद्दल शंका उपस्थित केल्या होत्या आणि आम्ही आवश्यक त्या ठिकाणी त्या दुरुस्त केल्या आणि विद्यार्थ्यांना माहिती दिली. मात्र आम्ही आमच्या जाहीर केलेल्या निकालावर ठाम आहोत आणि आम्ही सर्वांना खात्री देतो की त्यात कोणतीही चूक नाही. ' अशी प्रतिक्रिया NTA च्या अधिकार्यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना दिली आहे.
पर्सेंटाइल स्कोअर कसा काढतात?
पर्सेंटाइल स्कोअर हे परीक्षेला बसलेल्या सर्वांच्या Relative Performance वर आधारित गुण असतात. प्राप्त गुणांचे रूपांतर परीक्षार्थींच्या प्रत्येक सत्रासाठी 100 ते 0 पर्यंतच्या स्केलमध्ये केले जाते. पर्सेंटाइल स्कोअर त्या परीक्षेत त्या विशिष्ट टक्केवारीच्या समान किंवा कमी मिळवलेल्या उमेदवारांची टक्केवारी दर्शवते. त्यामुळे, प्रत्येक सत्रातील टॉपर 100 च्या समान टक्केवारी प्राप्त करेल. सर्वोच्च आणि सर्वात कमी स्कोअर दरम्यान मिळालेले गुण देखील योग्य टक्केवारीत रूपांतरित केले जातात.