भारतीय तरुणाने 3 वेळा नाकारली NASA ची ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलाहूनही नाही गेला अमेरिकेला, म्हणाला 'देशात राहून संशोधन करेन'
Donald Trump And Indian Young Scientist Gopal Jee | (Photo credit: archived, edited, symbolic images)

तुम्हाला जर जगप्रसिद्ध संशोधन संस्था नासा (NASA) ने ऑफर दिली तर तुम्ही ती नाकाराल? आणि हो.. एक दोन नव्हे तर चक्क 3 वेळा तुम्हाला नासा ऑफर देत आहे तरीही तुम्ही ती नाकाराल? त्यातही तुम्ही ती नाकाराली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President) दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही तुम्हाला नासासोबत कारण्याची ऑफर दिली तर?... तर ही ऑफरही तुम्ही नाकाराल? बहुतेक नाही. होय ना! पण, असे घडले आहे. एका भारतीय तरुणाने हे धाडस दाखवले आहे. व्यक्तीगत स्वार्थामधून नव्हे देशप्रेमातून. होय, मी भारतातच राहीन आणि भारतात राहून देशासाठी संशोधन करेन, असे या तरुणाने नासा आणि ड्रम्प यांनाही ठणकाऊन सांगितले आहे. गोपाल जी (Gopal Jee) असे या तरुणाचे नाव असून, तो बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातील ध्रुवगंज येथील रहीवासी आहे. गोपाल याचे वय केवळ 19 वर्षे इतके आहे. आता बोला.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल याने प्रतिवर्ष 100 मुलांना मदत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्याने हे काम 2019 मध्ये सुरु केले. या कामातून त्याने 8 मुलांसाठी प्रोविजनल पेटेंट घेतले आहे. गोपाल जी सध्या डेहराडून येथील ग्राफीक एरा (Graphic Era Institute Dehradun) या सरकारी संस्थेत प्रयोग करत आहे. झारखंड येथे एक प्रयोगशाळा काढून तेथे काम करण्याचा त्याचा मानस आहे.

गोपाल जी याने तुलसीपूर येथील मॉडेल हायस्कूल येथून इयत्ता 12 पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2013-14 मध्ये त्याने बनवलेल्या बायो सेल निर्मितीसाठी त्याला इन्स्पायर्ड अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. तेव्हा तो इयत्ता 10 वीत शिकत होता. दरम्यान, 2008 मध्ये त्याच्या गावात महापूराचे पाणी घुसले. सर्व काही वाहून गेले. त्याचे शेतकरी वडील प्रेमरंजन कुंवर यांनी त्याला सांगितले की, आता मी तूला इयत्ता 10 वीच्या पुढे शिकवू शकत नाही. मात्र, गोपाल जी हिंमत हारला नाही. तो प्रयत्न करत राहीला. त्याने शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तरुण संशोधक गोपाल जी याच्यााबत तुम्हीअधिक माहिती इथे जाणून घेऊ शकता. (हेही वाचा, इन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस)

गोपाल जीबाबत वृत्त देताना दै. भास्करने म्हटले आहे की, 31 ऑगस्ट 2017 मध्ये गोपाल जी याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला. पंतप्रधान मोदी यांनी त्याला एनआयएफ अहमदाबाद येथे पाठवले. त्याने इथे प्रयोग करुन 6 शोध लावले. आता त्याचे नाव जगभरातील पहिल्या 30 स्टार्टअप वैज्ञानिकांमध्ये घेतले जाते. येत्या एप्रिल महिन्यात अबुधाबी येते जगातील सर्वात मोठा सायन्स फेयर पार पडत आहे. यात जगभरातून तब्बल 6 हजार वैज्ञानिक सहभागी होणार असून, गोपाल जी या फेयरमध्ये प्रमुख वक्ता असणार आहे.