बारावीच्या (HSC) महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षांना (Maharashtra Board Exams) राज्यात 4 मार्च पासून सुरूवात झाली आहे. या परीक्षेमध्ये पहिलाच पेपर इंग्रजी (English) विषयाचा झाला आहे. या पेपर मध्ये एक प्रश्न चूकीचा असल्याने त्याचा 1 गुण विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे बोर्डाने जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक 1) A) 5 हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना बोर्डाकडून एक गुण अधिकचा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे तक्रारी मांडल्या होत्या. बोर्डानेही ती चूक मान्य करत त्याचा एक गुण देण्याचं ठरवलं आहे. हे देखील नक्की वाचा: HSC Exams Timetable Update: बारावीच्या 5 आणि 7 मार्चचे पेपर पुढे ढकलले; जाणून घ्या नव्या तारखा.
कोरोना संकटामुळे मागील दोन वर्ष शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. दोन वर्ष ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी पुरेशी तयारी न झाल्याने चिंतेमध्ये आहेत. मात्र बोर्डानेही कोरोना परिस्थितीचा विचार करता अभ्यासक्रम कमी करत आणि लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देत सुरक्षित वातावरणामध्ये ऑफलाईन परीक्षा पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra HSC Board Exams 2022: 12 वी लेखी परिक्षा 4 मार्चपासून; परीक्षेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गाईडलाईन्स .
यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे. त्यांच्या सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत 9635 परीक्षा केंद्र सज्ज करण्यात आली आहेत. एका वर्गात 25 विद्यार्थी बसवत परीक्षा केंद्रांवर 12वीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. या परीक्षा 7 एप्रिल पर्यंत चालणार आहेत.