UP Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथील एका मिशनरी शाळेने इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला इंग्रजी अस्खलितपणे बोलता येत नसल्याने काढून टाकले. मात्र, प्रवेशादरम्यान मुलाने शाळेची लेखी परीक्षा आणि समुपदेशन फेरीही उत्तीर्ण केली. त्यानंतरच त्याला प्रवेश मिळाला. ही बातमी पसरताच अनेक पालकांना संताप अनावर झाला. ज्या देशात राष्ट्रभाषा हिंदी आहे, तिथे इंग्रजी भाषेला इतके महत्त्व का दिले जाते? असा प्रश्न अनेक पालकांनी केला आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाझियाबादमधील रहिवासी असलेली एक महिला नुकतीच कसना येथील इंटर कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. शिक्षिकेचा पती गाझियाबादमध्ये एका खासगी कंपनीत काम करतो. पत्नीला ग्रेटर नोएडामध्ये नोकरी लागल्यावर कुटुंब येथे राहू लागले. त्यांनी आपल्या सात वर्षांच्या मुलाला अल्फा-2 येथील मिशनरी शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: लग्नाच्या 6 व्या दिवशी नववधुने दिला बाळाला जन्म, बातमी कळताच नवऱ्याने दिला तलाक)
चाचणीनंतर समुपदेशन करताना मुलाला इंग्रजी वाचन देण्यात आले. यानंतर पालकांकडून प्रवेश व शुल्कासह 55 हजार रुपये जमा करण्यात आले. ऑगस्ट महिन्यापासून मूल शाळेत जाऊ लागले. आता विद्यार्थ्याच्या आईचा आरोप आहे की, तिला शाळेतून बोलावून सांगण्यात आले की, तिच्या मुलाला इंग्रजी येत नाही. भाषा न समजल्यामुळे इंग्रजी भाषेत जो गृहपाठ दिला जातो, तो मुलाला करता येत नाही. तसेच, तुमचे मूल इंग्रजीऐवजी हिंदीत बोलते.
मुलाच्या आईचे म्हणणे आहे की, याकारणामुळे तिला अनेकवेळा शाळेत बोलावल्याने तिला लाज वाटली. यानंतर शाळेने मुलाचा टीसी काढून टाकला. तसेच शाळेने पालकांना फी परत घेऊन मुलाला दुसऱ्या शाळेत दाखल करण्यास सांगितले. या सर्व प्रकारामुळे देशातील शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.