Representational Image. (Photo Credits: PTI)

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून यंदा बोर्डाच्या परीक्षा पुन्हा ऑफलाईन घेतल्या जात आहेत. राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने शिक्षण मंडळ पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे. यामध्ये बारावीच्या लेखी परीक्षा (Maharashtra HSC Board Exams) 4 मार्च पासून सुरू होत आहेत. 4 मार्च ते 30 एप्रिल पर्यंत चालणार्‍या या परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात म्हणून बोर्डाने खास नियमावली देखील जारी केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित वातावरणामध्ये बोर्ड परीक्षा पार पडाव्यात म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा काय असेल नियमावली?

  • विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोविड 19 नियमावली पाळनं बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला येताना हॅन्ड सॅनिटायझर, फेस मास्क आणणं बंधनकारक आहे.
  • परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना किमान 30 मिनिटं आधी पोहचावं लागणार आहे. त्यांच्याजवळ अ‍ॅडमीट कार्ड असणं आवश्यक आहे.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं घेऊन येणं याला परवानगी नसेल. यामध्ये मोबाईल फोन, हेडफोन्स यांच्यावरही प्रतिबंध असेल.
  • यंदा लेखी परीक्षेसाठी 15 मिनिटं ते अर्धा तास अधिक दिला जाणार आहे त्यामुळे परीक्षेच्या वेळा नीट पाहून परीक्षाकेंद्रावर पोहचा.
  • प्रश्नावली आणि सूचना नीट वाचून मगच उत्तरपत्रिका लिहायला सुरूवात करा.
  • यंदा सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी वर्गात 25 पेक्षा अधिक विद्यार्थी नसतील.
  • सकाळी 10.30 ते 2 आणि दुपारी 3 ते 6.30 या वेळेत परीक्षा होतील.  हे देखील नक्की वाचा: HSC Exams Timetable Update: बारावीच्या 5 आणि 7 मार्चचे पेपर पुढे ढकलले; जाणून घ्या नव्या तारखा.

यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरम्यान 15 वर्षांवरील विद्यार्थ्यांना कोविड 19 लस घेण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे पण बारावीची परीक्षा देण्यासाठी लस बंधनकारक नसेल. लस न घेतलेल्यांना, एकच डोस घेतलेल्यांनाही बारावीची परीक्षा देता येणार आहे.