Delhi Law and Order: राजधनी दिल्ली (Delhi Crime News) शहरातील गुन्हेगारी आणि प्रदुषण आता नित्याचे झाले आहे. प्रदुषण कायम राहते तर गुन्हेगारीच्या घटना दररोजच कुठे ना कुठे घडत राहतात. त्यातील काही इतक्या क्षुल्लक कारणावरुन घडतात की, मानवी मुल्यांची इतकी हानी का व्हावी, हाच प्रश्न निर्माण होतो. पाठिमागच्या 24 तासात दिल्लीमध्ये हत्येच्या (Violent Incidents in Delhi) दोन घटना उघडकीस आल्या. या घटनेतील एक हत्या तर केवळ चाळीत सामूहिकरित्या वापरल्या जाणाऱ्या सौच्छालयात पाणी टाकण्यावरुन झालेल्या वादातून झाली. दुसऱ्या घटनेत एका व्यवसायिकस बंदुकीने गोळ्या घालून ठार मारण्यात आले. शनिवारी (7 डिसेंबर) दोन्ही घटना अनुक्रमे गोविंदपुरी (Govindpuri ) आणि शाहदराच्या (Shahdara Shooting) फार्श बाजार परिसरात घडल्या.
गोविंदपुरीत हाणामारीः सौचालयातील पाणी ठरले निमित्त
दिल्लीतील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. गोविंदपुरी येथील घटना त्यापैकीच एक. येथे इमारतीमध्ये सामूहिकरित्या वापरल्या जाणाऱ्या शौचालयात पाणी टाकण्यावरुन झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसन मोठ्या हाणामारीत झाले. ही हाणामारी पुढच्याकाहीच मिनिटांमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात परावर्तीत झाली. ही घटना दिल्लीतील गोविंदपुरी भागात शुक्रवारी रात्री घडली. घटनेतील बिखम सिंग नावाच्या आरोपीने त्याच्या शेजाऱ्यांवर स्वयंपाकघरातील चाकूने हल्ला केला, ज्यात तीन जण जखमी झाले. पीडितांपैकी एक असलेल्या सुधीर नावाच्या व्यक्तीस चाकू छाती आणिचेहऱ्यावर वर्मी लागला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर घटनेतील आणखी दोन जखमी प्रेम (22) आणि सागर (20) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा, Triple Murder in South Delhi: दक्षिण दिल्ली येथे तिहेरी हत्याकांड; आई, वडील आणि मुलीचा मृत्यू; नेब सराय येथील घटना)
शाहदरा गोळीबारात व्यावसायिकाचा मृत्यू
कृष्णा नगर येथील 52 वर्षीय व्यापारी सुनील जैन यांची गोळ्या घालून हत्या केली. यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मॉर्निंग वॉक करून स्कूटरवरून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी जैन यांच्यावर गोळीबार केला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी सात ते आठ गोळ्या झाडल्या, ज्यामुळे जैन गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमुळे व्यावसायिकाच्या कुटुंबास मोठा मानसिक धक्का बसला आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, भांड्यांचा व्यवसाय करणाऱ्या जैन यांचे कोणाशीही व्यावसायिक किंवा व्यक्तिगत वैर नव्हते. पोलीस उपायुक्त (शाहदरा) यांनी माहिती देताना सांगितले की, गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे आणि तपास सुरू आहे. संशयित अद्याप फरार आहेत. (हेही वाचा, Firing at GTB hospital in Delhi: दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात गोळीबार, तीन हल्लेखोरांनी रुग्णाला केलं लक्ष्य)
अरविंद केजरीवाल यांची भाजपवर टीका
विश्वास नगर में गोलीबारी के बाद अब गोविंदपुरी से चाकूबाज़ी की ख़बर आ रही है। बीजेपी के राज में अपराधी पूरी तरह से बेख़ौफ़ हो गए हैं। https://t.co/24yvI0X0Ux
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 7, 2024
आपचा केंद्रावर हल्ला
राजधानी दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवरुन आम आदमी पक्षाने केंद्र सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला. "विश्वास नगरमधील गोळीबारानंतर आता गोविंदपुरीतून चाकू हल्ल्याच्या बातम्या येत आहेत. भाजपाच्या राजवटीत गुन्हेगार पूर्णपणे निर्भय झाले आहेत, असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.