Knife Attack | (Photo credit: archived, edited, representative image)

Delhi Law And Order: दक्षिण दिल्ली बुधवारी (4 डिसेंबर) तिहेरी हत्याकांडाने हादरुन गेली. येथील नेब सराय (Neb Sarai Murder) परिसरातील एका घरात तिघांची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. मृतांममध्ये एक पुरुष आणि एका महिलेसह एका तरुणीचा समावेश आहे. तिघेही एकाच कुटुंबातील असून त्यांच्यात पती, पत्नी आणि मुलगी असे नाते आहे. राजेश (53), त्याची पत्नी कोमल (47) आणि त्यांची 23 वर्षीय मुलगी कविता अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, पहाटे 5 वाजणेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मारण्यासाठी घराबाहेर गेलेला मुलगा परतला तेव्हा घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. त्यानेच या घटनेची शेजाऱ्यांना कल्पना दिली. दरम्यान, घटना घडली तेव्हा मुलगा घरात नसल्याने बचावला, अशी माहिती पोलीस अधिऱ्यांनी दिली.

मॉर्निक वॉकवरुन आलेल्या मुलाला धक्का

दिल्लीतील गुन्हेगारी दाखवणाऱ्या या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राप्त माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तिहेरी हत्येचा सखोल तपास सुरू केला आहे. "प्रथमदर्शनी, घरात लुटमार किंवा चोरीची कोणतीही चिन्हे नाहीत", असे सांगतानाच अधिकाऱ्याने दरोड्याचा संशय प्रथमदर्शनी तरी नसल्याचे म्हटले आहे. एका शेजाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलाच्या माहितीस दुजोरा देत सांगितले की, 'पहाटे फिरायला जाण्यापूर्वीच त्याने आपल्या आईवडीलांना लग्नाच्या वढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, तो फेरफटका मारुन परत ' "त्याने आम्हाला सांगितले की त्याने फिरायला जाण्यापूर्वी त्याच्या पालकांना त्यांच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. परतल्यावर त्यांना ते आणि त्यांची बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. (हेही वाच, Woman Cuts Off Husband's Private Part: दिल्लीत घरगुती वादातून महिलेने कापले पतीचे गुप्तांग; आरोपी पत्नी फरार)

'केंद्र सरकार कायदा व सुव्यवस्थेत अपयशी'

दरम्यान, नेब सराय येथील घटनेमुळे दिल्लीमध्ये राजकीय वादाला तोंड फुडले आहे. आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी दिल्ली पोलिसांवर देखरेख ठेवणाऱ्या केंद्र सरकारवर जोरदार हल्ले केले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर केंद्रावर टीका करताना म्हटले, "दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, गोळ्या झाडल्या जात आहेत आणि दिल्लीत उघडपणे अंमली पदार्थ विकले जात आहेत. दिल्लीतील रहिवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. (हेही वाचा, Delhi Crime News: 16 वर्षाच्या मुलाची चाकूनं भोसकून हत्या,दिल्लीतील धक्कादायक घटना,गुन्हा दाखल)

मुख्यमंत्री आतिशी यांची केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका

अरविंद केजरीवाल यांच्याकडूनही टीका

माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही चिंता व्यक्त केली आणि केंद्रावर राजधानीच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. "नेब सरायमध्ये एकाच घरात तीन हत्या झाल्या. हे अत्यंत वेदनादायक आणि भीतीदायक आहे. गुन्हेगारांना मोकळीक देण्यात आली आहे आणि घरे उद्ध्वस्त केली जात आहेत. केंद्र शांतपणे पाहत आहे ", असे त्यांनी एक्स वर लिहिले.

कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारे दिल्ली पोलीस, शहरातील हिंसक गुन्ह्यांच्या मालिकेनंतर राजकीय आरोपांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. केंद्राच्या देखरेखीखाली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप करत आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप' च्या नेत्यांनी आपली टीका तीव्र केली आहे. नेब सराय परिसराला या दुर्घटनेचा धक्का बसला असून, परिसरातील रहिवाशांनी या भागातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल भीती आणि चिंता व्यक्त केली आहे.