CBSE कडून आज दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेत अपेक्षित यश ना मिळालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची त्यांच्या मार्कांची पुन्हा तपासणी करण्याचा एक पर्याय उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळता येऊ शकतं. मग तुम्हांलाही पुन्हा परीक्षा द्यायची असल्यास किंवा मार्क्स तपासून घ्यायचे असल्यास जाणून त्याबद्दलच्या बोर्डाने जाहीर केलेल्या महत्त्वाच्या तारखा!
सीबीएससी बोर्डाने निकाल जाहीर होण्यापूर्वी supplementary exams आणि reevaluation बद्दल नोटीस जाहीर केलेली आहे. त्यानुसार आता आज निकाल लागल्यानंतर supplementary exam 15 जुलै पासून सुरू होणार आहे. दरम्यान रिव्हॅल्युएशन आणि सप्लिमेंटरी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत त्यासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. गुण पडताळणीची सुविधा 17 मे पासून पाच दिवसांसाठी उपलब्ध असेल आणि 21 मे रोजी संपेल. मार्क्स व्हेरिफिकेशन, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी घेणं ही प्रक्रिया सशुल्क असणार आहे. त्यासाठी प्रत्येकी 500 रूपये मोजावे लागणार आहेत. तर मार्क्स रिइव्हॅल्युएशन करण्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी 100 रूपये मोजावे लागणार आहेत. इथे पहा दहावी साठी परिपत्रक आणि इथे पहा बारावी साठी परिपत्रक!
Revaluation साठी कसा कराल अर्ज?
cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
होम पेज वर revaluation साठी लिंक दिसेल.
तुमचे तपशील टाकून लॉगिन करा.
आता तुमचा अर्ज भरा आणि फी भरा.
तुमचा फॉर्म आणि फी भरल्याची पावती डाऊनलोड करून ठेवा.
आज जाहीर झालेल्या निकालामध्ये बारावीच्या परीक्षेत 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर दहावीच्या परीक्षेमध्ये 98.61% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.