CBSE 10th Result 2024 Declared: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काही वेळापूर्वी बारावीचा निकाल जाहीर केला होता. आता बोर्डाने दहावीचाही निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांच्या रोल नंबरद्वारे स्कोअरकार्ड तपासू शकतात. सीबीएसई 10वीचा निकाल 93.60 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत 0.48 टक्के अधिक निकाल लागला आहे. गेल्या वर्षी 93.12  टक्के मुले दहावी उत्तीर्ण झाली होती. सीबीएसई बोर्ड 10वीमध्येही त्रिवेंद्रम अव्वल राहिले. येथील उत्तीर्णतेची टक्केवारी 99.75% इतकी आहे. (हेही वाचा: CBSE Board 12th Class Result Declared: सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; cbse.gov.in वर चेक करू शकाल)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)