दिल्लीत शेतकरी मोर्चा च्या पार्श्वभूमीवर CBSE Board Exams च्या तारखांमध्ये बदल केल्याचं खोटं पत्रक वायरल झालं आहे. यावर प्रतिक्रिया देताना बोर्डाने बारावीच्या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याचं जाहीर केले आहे. तसेच याबाबत वायरल होत असलेलं पत्र खोटं असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. पत्रकात दिल्यानंतर कोणत्याही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या नसल्याचं बोर्डाने म्हटलं आहे. सीबीएससी ने यंदा  इयत्ता 10 आणि 12 च्या बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल 2024 दरम्यान आयोजित केल्या  आहेत. CBSE Fake 'X' Handles: सीबीएसईने बोर्ड परीक्षेपूर्वी जाहीर केली 30 बनावट 'X' हँडलची नावे; फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन, पहा संपूर्ण यादी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)