CBSE Fake 'X' Handles: खोट्या बातम्या रोखण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठे पाऊल उचलले आहे. सीबीएसई बोर्डाने एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) बोर्डाचे नाव किंवा लोगो वापरणाऱ्या 30 सोशल मीडिया हँडलवर कारवाई केली आहे. बोर्डाला ही खाती दिशाभूल करणारी वाटली त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त अधिकृत X हँडल फॉलो करण्याचा सल्ला दिला आहे. अधिकृत नसलेल्या खात्यांचा वापर करून सर्वसामान्यांची दिशाभूल केली जाऊ शकते किंवा चुकीची माहिती दिली जाऊ शकते, असे बोर्डाचे म्हणणे आहे. बोर्डाने म्हटले आहे, ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणत्याही शैलीत सीबीएसईचे नाव आणि लोगो वापरून इतर कोणत्याही अनधिकृत स्त्रोताने दिलेल्या माहितीसाठी बोर्ड जबाबदार राहणार नाही.’ (हेही वाचा: Free Education for Girls in Maharashtra: मुलींना मोफत शिक्षण; मेडिकल, इंजिनिअरिंग 600 अभ्यासक्रमांना घेता येणार प्रवेश)
पहा यादी -
#CBSE cautions and issues advisory to follow only its official handles i.e. @cbseindia29 pic.twitter.com/OnD3Vvv7Zl
— PIB in Bihar 🇮🇳 (@PIB_Patna) February 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)