मुलींना मोफत शिक्षण (Free Education for Girls) येत्या जून 2024 पासून घेता येणार आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही माहिती दिली आहे. ते जळगाव येथील कवयत्रिती बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University) आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी सांगितले की, ज्या कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न आठ लाखांहून कमी आहे, अशा कुटुंबातील मुलींना येत्या जूनपासून मोफत शिक्षण घेता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मेडीकल, अभियांत्रीकी यांसह वेगवेगळ्या अशा 600 पेक्षाही अधिक अभ्यासक्रमांना मुली मोफत प्रवेश घेऊ शकतात.
आठ लाखांपेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना लाभ
चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या एकूण अभ्यासक्रमाची 100% शक्षणिक शुल्क परीपूर्ती राज्य सरकारद्वारे केली जाणार आहे. या संकल्पनेत आठ लाखांपेक्षा कमी वार्षीक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मुलींना तसे इतर मागास वर्गातील मुलींना मोफत शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये मुलीचे प्रवेश अधिक होतील. खास करुन हे प्रवेश वाढावेत यासाठी विशेष अभियान राबवावे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
सीईटी परीक्षेचे वेळापत्रक नियोजित
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सीईटी परीक्षेचे या वर्षी वेळापत्रक नियोजित केले आहे. ज्यामुळे परीक्षेच्या वेळेत कोणताही बदल करावा लागल नाही. त्यात धर्तीवर विद्यापीठानेही परीक्षांचे वेळापत्रत निश्चीत करावे आणि ते जाहीर करुन निकाल जाहीर करावे, असे पाटील म्हणाले.
मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल
राज्यातील मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशिल आहे. त्यासाठी राज्य सरकार आवश्यक पावले उचलत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही विविध देशांना भाताकडून आपेक्षा आहेत. खास करुन जर्मनी, जपान, इस्त्रायल यांसारख्या देशांना भारताकडून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याची आपेक्षा आहे. अशा वेळी महाराष्ट्राने जर कौशल्यावर आधारीत आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालविण्यावर भर देण्याचे ठरवल्याचे सरकारच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि सामाजिक विकास अपेक्षीत आहे. त्यात विशेष कार्य करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरुंना आवश्यक सूचना करण्यातत आल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, मुलींना मोफत शिक्षण मिळते तर मुलांनी काय घोडे मारले आहे. मुलांनाही मोफत शिक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी पुढे येत आहे. जळगाव येथील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ही मागणी केली. मात्र, विद्यार्थ्यांचे कोणतेही म्हणने चंद्रकांत पाटील यांनी ऐकूण घेतले नसल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने खरोखरच मुलींना मोफत उच्च शिक्षण दिले तर मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.