CBSE Board 12th Class Result Declared: सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर; cbse.gov.in वर चेक करू शकाल

गेल्या वर्षी (2023) एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.33 होती. म्हणजेच यंदाच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्के चांगला लागला आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे.

CBSE Board 12th Class Result Declared: सीबीएसई बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर;  cbse.gov.in वर चेक करू शकाल
Students (प्रातिनिधिक प्रतिमा)

CBSE Board 12th Class Result: सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बाब आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच 12वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्ड 12वीचा निकाल 2024 अधिकृत वेबसाइट cbse.gov.in, cbse.nic.in, results.cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर तपासता येईल. यासह हा निकाल उमंग आणि डिजीलॉकरवर देखील तपासला जाऊ शकतो. यंदा एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी (2023) एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.33 होती. म्हणजेच यंदाच्या निकालात 0.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल 6.40 टक्के चांगला लागला आहे, असे बोर्डाचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Unemployment Rate Decline In India: भारतातील बेरोजगारीच्या संख्येत लक्षणीय घट, सरकारी आकडेवारीतून दावा)

पहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2024 11:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).