प्रतिकात्मक फोटो (File Photo)

BPCL Apprentice Recruitment 2021:  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिडेट, बीपीसीएलने अप्रेंटिस पदावर नोकर भरती केली जाणार आहे. या अंतर्गत एकूण 87 पदांवर योग्य उमेदवार निवडले जाणार आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदावर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्किम, एनटीएसची अधिकृत वेबसाइट mhradnats.gov.in च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, अर्ज करण्याची अखेरची तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे.

बीपीसीएल कडून जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या 42 आणि टेक्निशियन अप्रेंटिसच्या 45 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. तर अप्रेंटिसशिपचा कालावधी हा एका वर्षासाठी असणार आहे.(IREL Recruitment 2021: भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागात 54 पदांसाठी भरती, 'असा' करा अर्ज)

ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त भारतीय युनिव्हर्सिटी/संस्थेतून 6.3 सीजीपीएसह संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली असावी. तसेच टेक्निशियन अप्रेंटिसवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी तंत्रज्ञान शिक्षण बोर्ड/मान्यता प्राप्त भारतीय युनिव्हर्सिटीतून संबंधित विषयात इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी असावी.

पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावेत. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार सवलत दिली जाईल.

बीपीसीएलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पात्रता परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी सामान्य एससी/ एसटी/ ओबीसी/ पीडब्ल्यूडी श्रेणीनुसार तयार केली जाईल. याशिवाय, भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.