शासकीय नोकरीच्या (Government Jobs) शोधात असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आयआरईएल (IREL) इंडिया लिमिटेड, भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने देशभरातील त्याच्या प्रकल्प / युनिट / कार्यालयात 54 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने जारी केलेली जाहिरात क्र. (CO/HRM/07/2021) नुसार पदवीधर प्रशिक्षणार्थी (वित्त), पदवीधर प्रशिक्षणार्थी (HR), पदविका प्रशिक्षणार्थी तांत्रिक, कनिष्ठ पर्यवेक्षक, वैयक्तिक सचिव आणि व्यापारी प्रशिक्षणार्थी या पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. IREL मध्ये या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.
इच्छुक उमेदवार IREL इंडिया लिमिटेड, irel.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. नंतर करिअर विभागात जाऊ शकतात. करिअर पृष्ठावर जाहिरात क्र (CO/HRM/07/2021) भरतीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा खाली दिलेल्या थेट दुव्यावरून, उमेदवार अर्ज पृष्ठावर जाऊ शकतात. जिथे त्यांना प्रथम नवीन नोंदणीवर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. नंतर त्यांच्या ईमेल आयडी आणि पासवर्डद्वारे लॉगिन करून अर्ज सबमिट करावा लागेल. हेही वाचा CA Intermediate Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सीए इंटर निकालाची तारीख जाहीर, 'असा' पाहता येईल निकाल
यासाठी शैक्षणिक पात्रता सीसी इंटरमीडिएट किंवा सीएमए इंटरमीडिएट/ कॉमर्समध्ये मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून एससी उमेदवारांसाठी एकूण 50% गुण आणि इतरांसाठी एकूण 60% गुण असावे. पदवीधर प्रशिक्षणार्थीसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून एकूण 60% गुणांसह कोणत्याही विषयात पदवीधर असावा. डिप्लोमा प्रशिक्षणार्थीसाठी AICTE द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून खाण / रसायन / यांत्रिक / इलेक्ट्रिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा एससी / एसटी उमेदवारांसाठी एकूण 50% गुण आणि इतरांसाठी एकूण 60% गुणांसह समकक्ष असणे गरजेचे आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीमध्ये अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम म्हणून मास्टरसह पदवी असावी.
ऑनलाईन अर्जाच्या वेळी, उमेदवारांना 400 रुपये शुल्क भरावे लागेल, जे ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे भरता येईल. मात्र एससी, एसटी, ईएसएम, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये पूर्ण सूट देण्यात आली आहे.