पाचवी ते आठवी पर्यंतच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार; केंद्र सरकारचा नवा निर्णय
School Kids (Photo credit : commons.wikimedia)

अभ्यासात फारशी गती नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा (Central Government) हा निर्णय अतिशय दिलासादायक आहे. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा होणार आहे. शिक्षण हक्क कायदा-2009 मध्ये केलेल्या बदलानुसार फेरपरीक्षांचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पाचवी ते आठवी या इयत्तेतील जे विद्यार्थी नापास होतील, त्यांची दोन महिन्यांच्या आत फेरपरीक्षा होणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार, देशात प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली ते आठवीपर्यंत शिक्षणाचा अधिकार आहे. यापूर्वी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पहिली ते चौथी या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नापास न करता पुढील वर्गासाठी अभ्यास करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आता पाचवी ते आठवी पर्यंतच्या नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल आणि पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. (कलेक्टरची मुलगी शिक्षणासाठी अंगणवाडी शाळेत; हायफाय स्कूलचा हट्ट धरणाऱ्या पालकांना धडा)

नापास होणार विद्यार्थ्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये आणि त्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.