Hypersonic Technology Demonstrator Vehicle: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) ने आज ओदिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर बेटावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम लाँच कॉम्प्लेक्सवरून सकाळी 11वाजून 03 मिनिटांनी हायपरसॉनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या व्हेईकलच्या (एचएसटीडीव्ही) उड्डाण चाचणीद्वारे हायपरसॉनिक एअर-ब्रीदिंग स्क्रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वीरित्या चाचणी केली. या यशस्वी प्रात्यक्षिकानंतर देशाने प्रगत हायपरसॉनिक वाहनांसाठी हायपरसॉनिक विश्वात प्रवेश केला आहे.
हायपरसॉनिक क्रूझ व्हेईकलचे एक घन रॉकेट मोटर वापरुन उड्डाण केले गेले होते. ज्याद्वारे ते 30 किलोमीटर (किमी) उंचीवर नेण्यात आले. जिथे एरोडायनामिक उष्णता कवच हायपरसॉनिक मॅक क्रमांकावर विभक्त केले गेले. क्रूझ वाहन प्रक्षेपण वाहनापासून विभक्त झाले आणि ठरल्यानुसार वायुद्वार उघडले. (हेही वाचा -Kerala Shocker: तिरुअनंतपुरममध्ये COVID-19 नकारात्मक प्रमाणपत्र देण्याच्या बहाण्याने आरोग्य अधिकाऱ्याकडून 44 वर्षीय महिलेवर बलात्कार)
.@DRDO_India successfully demonstrates the #hypersonic air-breathing scramjet technology with the flight test of Hypersonic Technology Demonstration Vehicle.
Read here: https://t.co/wMEn2OnN5p pic.twitter.com/sEulNN48vl
— PIB India (@PIB_India) September 7, 2020
हायपरसोनिक ज्वलन सुरु राहून क्रूझ वाहन आपल्या इच्छित उड्डाण मार्गावर ध्वनीच्या गतीच्या सहा पट वेगाने म्हणजेच 02 किमी / सेकंद नुसार सुमारे 20 पेक्षा अधिक सेकंदासाठी त्याच्या इच्छित उड्डाण मार्गावर कार्यरत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचा दृष्टिकोन साकार करण्याच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले. या प्रकल्पाशी संबंधित वैज्ञानिकांशीही त्यांनी संवाद साधला आणि या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. भारताला त्यांचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.