Kerala Shocker: देशात कोरोना विषाणूचं संकट अधिक गडद होताना दिसून येत आहे. अशातचं विविध ठिकाणाहून माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत आहेत. केरळमधील पठानमथिट्टा (Pathanamthitta) जिल्ह्यातील अरणमुला (Aranmula) येथे रविवारी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) 19 वर्षीय मुलीवर अम्ब्युलन्स ड्रायव्हरने (Ambulance Driver) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अशातचं आता केरळची राजधानी तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे एका 44 वर्षीय महिलेवर आरोग्य अधिकाऱ्याने (Junior Health Inspector) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रदीप कुमार असं या आरोपीचं नाव असून तो रुग्णालयात ज्युनियर हेल्थ इन्स्पेक्टर म्हणून काम करत होता. या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने रविवारी वेल्लारदा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेने क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला होता. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करण्यासाठी तसेच कोरोना निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र घेण्यासाठी आरोपीने या महिलेला आपल्या घरी बोलावलं. त्यानंतर आरोग्य अधिकाऱ्याने पीडितेचा लैंगिक छळ केला. (हेही वाचा - Kerala Horror: केरळ मधील पठानमथिट्टा जिल्ह्यात कोरोना बाधित मुलीवर अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरकडून बलात्कार; आरोपी अटकेत)
प्राप्त माहितीनुसार, पीडित महिलेने या आरोग्य अधिकाऱ्याविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पीडित महिलेवर हात आणि तोंड बांधून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळचे आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी चौकशी प्रलंबित ठेवून कुमार यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.