Kerala Horror: केरळ मधील पठानमथिट्टा जिल्ह्यात कोरोना बाधित मुलीवर अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरकडून बलात्कार; आरोपी अटकेत
Sexual assault | Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) 19 वर्षीय मुलीवर अम्ब्युलन्स ड्रायव्हरने (Ambulance Driver) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना केरळ (Kerala) येथून समोर येत आहे. ही घटना केरळमधील पठानमथिट्टा (Pathanamthitta) जिल्ह्यातील अरणमुला (Aranmula) येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने पीडितेला कोझेनचेरी (Kozhencherry) येथून कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Centre) नेण्यात येत होते. त्यावेळेस मुलीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. नौफळ (Noufal) असे त्याचे नाव असून तो कायमकुलमचा (Kayamkulam) रहिवासी आहे. (अहमदनगर: बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने आरोपीने पीडितेच्या मुलीवर पेट्रोल टाकून दिले पेटवून!)

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अम्ब्युलन्समध्ये 2 रुग्ण होते. एकाला कोझेनचेरी जिल्ह्यातील रुग्णालयात सोडण्यात आले. त्यानंतर आरोपीने अम्ब्युलन्स निर्जन ठिकाणी नेली आणि 19 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. "पहिल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्य सोडल्यानंतर रुग्णवाहिका चालक मुलीला घेऊन एका निर्जन स्थळी गेला आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलीला कोविड केअर सेंटरमध्ये सोडले," अशी माहिती पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. (उत्तर प्रदेश: 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; जीभ कापुन, डोळे फोडुन मृतदेह शेतात फेकल्याचा मुलीच्या वडिलांंचा दावा)

कोविड सेंटरमध्ये पोहचल्यानंतर पीडितेने घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. तिने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी अम्ब्युलन्स ड्रायव्हर नौफळ याला अटक केली. नौफळ हत्या प्रकरणातही दोषी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पीडित कोरोना बाधित मुलीवर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. लवकरच तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील.