प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

काल जेव्हा भारत स्वातंत्र्यदिनाचा (Indian Independence Day) उत्साह साजरा करत होता तेव्हा उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील लखीमपुर खेरी (Lakhimpuri Kheri) या भागात एका 13 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शेतात आढळुन आला होता, या प्रकरणी तपास केला असता या मुलीवर बलात्कार (Gangrape) करुन तिची हत्या झाल्याचे समोर येत आहे. युपी पोलिस निरिक्षक सत्येंद्र कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांंगितले की, काल या मृतदेहाचा तपास लागताच पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला आणि आज त्याचा अहवाल प्राप्त होताच ही बलात्काराची घटना असल्याचे उघड झाले. दरम्यान मुलीच्या वडिलांंनी बलात्कार्‍यांनी मुलीचे डोळे फोडून, जीभ कापुन मग तशाच निर्दयी अवस्थेत तिचा मृतदेह फेकुन दिला होता असा दावा केला आहे मात्र युपी पोलिसांंनी हा दावा फेटाळुन लावला आहे. लज्जास्पद! 10 वर्षाच्या गतिमंद बहिणीवर भावानेच मित्रांसोबत मिळून केला सामूहिक बलात्कार

प्राप्त माहितीनुसार, सदर मृत मुलगी ही इसानगर येथील राहत्या घरातुन शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडीलांनी पोलिसांकडे तक्रार केली असता शनिवारी पोलिसांना तपासाच्या दरम्यान या मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात सापडला. ओळख पटवताच पोलिसांंनी हा मृतदेह पुढील तपासासाठी पोस्टमॉर्टम साठी धाडला. मुलीच्या वडिलांंनी म्हंटल्याप्रमाणे मृतदेह सापडला तेव्हा डोळे किंंवा जीभ काढुन टाकलेले नव्हते मात्र तिच्या अंगावर अनेक ओरखडे होते अशी माहिती पोलिसांंनी दिली आहे.

ANI ट्विट

पोलिस निरिक्षक सत्येंद्र कुमार यांंच्या माहितीनुसार याप्रकरणात दोन जणांंना अटक करण्यात आली आहे. त्यांंच्यावर आयपीसी कलम 302 (मर्डर) आणि कलम 376 (D) अंतर्गत सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सविस्तर तपास करुन बलात्कार्‍यांना शिक्षा केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या 13 वर्षीय चिमुकलीला न्याय मिळवुन देण्यासाठी ट्विटर वर मागण्या होत आहेत.