
बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नुकतीच जयपूर (Jaipur) मध्ये घडल्याचे समोर येत आहे. जयपूरमधील मनोहरपूर येथे राहणाऱ्या एका भावाने आपल्याच 10 वर्षाच्या बहिणीचा त्रास होत असल्याने तिला जंगलात नेऊन मित्रांच्या सोबत तिच्यावर बलात्कार करून मारून टाकल्याचे समजतेय. ही मृत चिमुकली गतिमंद होती, त्यामुळे तिचं सगळं काही घरच्यांना करावं लागत होतं, हा त्रास नकोसा झाल्याने तिच्या भावाने तिच्या हत्येसाठी हा कट आखला होता. ज्यानुसार, मनोहरपूर भागाला लागून असणाऱ्या छोट्या जंगलात तिला नेऊन तिची हत्या करण्यात आली. त्याआधी तिचा सख्खा भाऊ आणि त्याच्या चार मित्रांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला होता असे पोस्टमोर्टम अहवालातून सिद्ध झाले आहे. हा सर्व प्रकार 17 मे रोजी घडला. Bois Locker Room Case मध्ये ट्विस्ट! अल्पवयीन मुलीने मित्राची परीक्षा घेण्यासाठी फेक अकाऊंट वरून सुरु केली होती Gang Rape ची चर्चा, वाचा सविस्तर
प्राप्त माहितीनुसार, पीडित मृत चिमुकली ही 17 मे रोजी घरातून गायब झाली, त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार नोंदवली, पोलिसांजी सर्वत्र तपास करताच तीन दिवसांनी म्हणजेच 20 मे रोजी या मुलीची चप्पल आणि फाटलेले कपडे त्यांना जंगलाकडे जाणाऱ्या वाटेत आढळून आले. या आधारे त्यांनी जंगलात तपास केला असता त्यांना झाडाझुडपात अडकलेला मुलीचा मृतदेह सुद्धा सापडला. केरळ: प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी 'त्याने' पत्नीच्या अंगावर कोब्रा आणि रसेल व्हायपर साप सोडुन केली हत्या; पोलीस तपासात दिली कबुली
दरम्यान, पोलिसांनी त्याभागातील रहिवाशांकडे याबाबत विचारणा केली असता संबंधित मुलगी तिच्या भावासोबतच घरातून बाहेर पडताना पाहिल्याचे अनेकांनी सांगितले, तसेच जाहलाच्या जवळ राहणाऱ्या एका साक्षीदाराने सुद्धा तिला तिच्या भावासोबत पाहिल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या भावला पोलीस स्थानकात बोलावून चौकशी केली यावेळी घाबरून गेल्याने त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच बलात्कार करताना सोबत असलेल्या चार मित्रांची नावे सुद्धा उघड केली. पोलिसांच्या माहितीनुसार हे सर्व आरोपी 19 ते 21 या वयोगटातील आहेत.