Bois Locker Room Case मध्ये ट्विस्ट! अल्पवयीन मुलीने मित्राची परीक्षा घेण्यासाठी फेक अकाऊंट वरून सुरु केली होती Gang Rape ची चर्चा, वाचा सविस्तर
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

बॉईस लॉकर रूम (Bois Locker Room Case) प्रकरणाच्या पोलिस तपासात आता वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. सामूहीक बलात्कार (Gang Rape) आणि अन्य अश्लील चॅट्सचे जे स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम ग्रुपवर शेअर केले गेले होते त्यात सिद्धार्थ नावाच्या मुलाच्या अकाऊंट वरून ही चर्चा सुरु झाल्याचे दिसले होते मात्र हे अकाउंट फेक असून ते एका मुलीने तयार केले असल्याचे आता पोलिसांच्या तपासात उघड आले आहे. या मुलीने आपल्या मित्राची परीक्षा घेण्यासाठी "सिद्धार्थ" नावाची फेक आयडी तयार करून या ग्रुप वर मॅसेज केला होता. याबाबत अटक करण्यात आलेल्या मुलांनी पोलिसांना सांगितले की सिद्धार्थ या अकाउंट वरून केलेल्या एका मॅसेज मध्ये ग्रुप मधील मुलांना बलात्कार करण्यात इंटरेस्ट आहे का असा प्रश्न केला होता, मात्र बाकीच्या मुलांनी लगेचच या मेसेजला नकार दिला. इतकेच नव्हे तर अन्य मित्रांनाही या अकाउंट बद्दल त्यांनी माहिती दिली होती. Bois Locker Room Instagram Group Chat हे प्रकरण काय हे सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

जर का तुम्ही बॉईज लॉकर रूमचे व्हायरल झालेले चॅट्स पाहिले तर त्यात सिद्धार्थ नावाच्या अकाउंट वरून हे सर्व आक्षेपार्ह्य मॅसेज करण्यात आल्याचे दिसत आहे. आता हे अकाउंटच फेक असून एका मुलीने सुरु केले होते हे स्पष्ट झाले आहे. अर्थात स्वतःच हे अकाउंट सुरु केल्याने या मुलीने या प्रकरणी कुठीही वाच्यता केली नव्हती. दरम्यान शाळेच्या एका इंस्टाग्राम ग्रुप वर मात्र हे स्क्रिनशॉट लीक झाले आणि मग हे एकूणच प्रकरण वाढले.

दरम्यान, 'बॉइज लॉकर रूम' प्रकरणाचा तपास CBI द्वारे करण्यात यावा अशी मागणी करणारी जनहीतयाचिका न्यायालात दाखल करण्यात आली आहे.यापूर्वी हे प्रकरण समोर येताच दिल्ली महिला आयुक्तालयाने (डीसीडब्ल्यू) पोलिस आयुक्तांना पत्र लिहून यामध्ये दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी यातील एका 15 वर्षीय मुलाला आणि 18 वर्षाच्या ग्रुप अ‍ॅडमिनला अटक केली होती.