Bois Locker Room Instagram Chat Group of Delhi Teenagers Glorifying Gang Rape Busted (Photo Credits: Twitter)

इन्स्टाग्रामवरच्या Bois Locker Room या चॅट ग्रुपमध्ये किशोरवयींन मुलांच्या सामूहिक बलात्कारविषयीचे स्क्रीनशॉट सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. 17 ते 18 वर्षांची ही मुले सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्याचा सल्ला देत आहेत असे या चॅटवरुन कळत आहे. हे खूपच धक्कादायक असून याची दखल घेत दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिस आणि इन्स्टाग्रामला नोटिस बजावली आहे. ज्यात या आरोपींविरुद्धची FIR आणि तपशीलाची मागणी केली आहे. ही माहिती आम्हाला येत्या 8 मे पर्यंत देण्यात यावी असेही यात नोटीशीत म्हटले आहे.

अल्पवयीन मुलांचे सामूहिक बलात्काराविषयीचे अश्लील चॅट सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतरही दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात कोणतीही अॅक्शन घेतली नाही तसेच त्यांना अटकही घेतले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या DCW ने दिल्ली पोलिस आणि इन्स्टाग्राम ला नोटीस बजावली आहे. हा प्रकार खूपच धक्कादायक असून सोशल मिडियासारख्या प्लॅटफॉर्मवरून असे प्रकार घडणे अवैध आहे असेही दिल्ली महिला आयोगाने म्हटले आहे. Bois Locker Room या Instagram ग्रुप मध्ये Gang Rape संबंधित दिल्ली येथील किशोरवयीन मुलांचे धक्कादायक चॅट व्हायरल (See Photos)

या नोटीस मध्ये DCW ने त्या ग्रुपचा अॅडमिन, सर्वांचे ईमेल आयडी, IP address आणि लोकेशन मागितले आहेत.

व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉट नुसार या मध्ये एक मुलगा बाकीच्या मित्रांना चक्क तुम्ही सामूहिक बलात्कार करून पाहाच असे उपदेश देत आहे. संबधित स्क्रिनशॉट हे एका मुलीनेच व्हायरल केले असून तिच्या माहितीनुसार ही मुले साऊथ दिल्ली मधील असून साधारण त्यांचे वय 17 ते 18 इतकेच आहे. या ग्रुप मधील दोन मुले ही या मुलीच्या शाळेतील आहेत. त्यांचे हे चॅट्स Boy's Locker Room किंवा Bois Locker Room या ग्रुप वर सुरु असतात, इंस्टाग्राम व स्नॅपचॅट वर त्यांचे असे अनेक ग्रुप आहेत, या ग्रुप मध्ये ही मुलं आपल्याच समवयीन मुलींचे फोटो हे नग्न फोटोंवर मॉर्फ करून सुद्धा मस्करी करत असतात. हा विषय या मुलांसाठी जितका कॉमन आहे हे पाहूनच आपण धास्तावलो आहोत असे या मुलीने म्हंटले आहे.