Bois Locker Room या Instagram ग्रुप मध्ये Gang Rape संबंधित दिल्ली येथील किशोरवयीन मुलांचे धक्कादायक चॅट व्हायरल (See Photos)
Boy's Locker Room Instagram Chat Group of Delhi Teenagers Glorifying Gang Rape Busted (Photo Credits: Twitter)

दिल्ली (Delhi) मधील काही किशोरवयीन मुलांच्या Boy's Locker Room या इंस्टाग्राम चॅट ग्रुप मध्ये अलीकडेच सामूहिक बलात्कार (Gang Rape) विषयावरून सुरु झालेल्या गप्पांचे स्क्रिनशॉट सध्या ट्विटर वर व्हायरल होत आहेत. व्हायरल होणाऱ्या स्क्रिनशॉट नुसार या मध्ये एक मुलगा बाकीच्या मित्रांना चक्क तुम्ही सामूहिक बलात्कार करून पाहाच असे उपदेश देत आहे. संबधित स्क्रिनशॉट हे एका मुलीनेच व्हायरल केले असून तिच्या माहितीनुसार ही मुले साऊथ दिल्ली मधील असून साधारण त्यांचे वय 17 ते 18 इतकेच आहे. या ग्रुप मधील दोन मुले ही या मुलीच्या शाळेतील आहेत. त्यांचे हे चॅट्स Boy's Locker Room किंवा Bois Locker Room या ग्रुप वर सुरु असतात, इंस्टाग्राम व स्नॅपचॅट वर त्यांचे असे अनेक ग्रुप आहेत, या ग्रुप मध्ये ही मुलं आपल्याच समवयीन मुलींचे फोटो हे नग्न फोटोंवर मॉर्फ करून सुद्धा मस्करी करत असतात. हा विषय या मुलांसाठी जितका कॉमन आहे हे पाहूनच आपण धास्तावलो आहोत असे या मुलीने म्हंटले आहे.

या ट्विटला बराच प्रतिसाद मिळाला आहे, यावर प्रतिक्रिया देणारे अनेक जण हे या मुलांच्या ओळखीतील आहे.सर्वांनी या चॅट्सवर आक्षेप घेत यामध्ये पोलिसांनी लक्ष घालावे आणि योग्य ती कारवाई कारवाई अशी मागणी केली आहे.

पहा हे व्हायरल चॅट्स

Boy's Locker Room Instagram Chat Group of Delhi Teenagers Glorifying Gang Rape Busted
Boy's Locker Room Instagram Chat Group of Delhi Teenagers Glorifying Gang Rape Busted

या मुलीने अन्य एका ट्विटमध्ये इंस्टाग्राम ग्रुपमधील लोकांच्या यादीचा स्क्रीनशॉटदेखील पोस्ट केला आहे. यातील ज्या व्यक्तींना तुम्ही ओळखता त्यांचे अकाउंट ब्लॉक करा असे तिने आपल्या मित्रांना सांगितले आहे.

पहा फोटो

Netizens are identifying the boys (Photo Credits: Twitter)

दरम्यान, याप्रकरणाची सोशल मीडियावर सध्या बरीच चर्चा आहे म्हणूनच पोलिसांनी सुद्धा यामध्ये लक्ष घालावे अशी इच्छा व्यक्त केली जातेय. अद्याप दिल्ली पोलीस किंवा सायबर सेल ने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.