Scam | Representative Image (Photo Credit- Pixabay)

Digital Arrest Scam Alert: सायबर गुन्हेगार कोणताही विचार न करता पीडितांकडून पैसे उकळतात, अशा 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यांमध्ये वाढ होत असल्याचा इशारा केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. नागरिकांना धमकावणारे, ब्लॅकमेल करणारे, खंडणी मागणारे आणि 'डिजिटल अपहरण' करणारे सरकारी अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांशी संबंधित अधिक स्काइप खाती आयफोरसीने अगोदरच ब्लॉक केली आहेत. दरम्यान अलीकडे देशभरात 'डिजिटल अरेस्ट स्कॅम'च्या अनेक घटना समोर येत आहेत. ज्यात फसवणूक करणारे पोलिस, बँक अधिकारी किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आणि नंतर खात्यांमधून पैसे काढून गायब होतात. डिजिटल अरेस्ट घोटाळ्याअंतर्गत फसवणूक करून  लोकांकडून पैसे उकळतात. कायदेशीर कारवाईची धमकी देऊन किंवा काहीही न सांगता बँक खात्यातून पैसे काढू शकतात.

येथे पाहा, पोस्ट 

दरम्यान, असे समोर आले आहे कि, हे घोटाळे सीमेपलीकडील (क्रॉस-बॉर्डर) गुन्हेगारी सिंडिकेटद्वारे चालवले जातात, जे एक मोठ्या, संघटित ऑनलाइन आर्थिक गुन्हेगारी नेटवर्कचा भाग आहेत. दरम्यान, अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही सायबर फसवणुकीची तक्रार ताबडतोब करा, 1930 वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in तक्रार नोंदवा. जागरूक राहा आणि घोटाळे टाळा!