Delhi Accident: नवी दिल्ली येथील पंचशील पार्क मेट्रो स्टेशन जवळ गुरुवारी रस्ता ओलांडताना जेसीबीच्या धडक लागल्याने अपघात घडून आला. अपघातात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 7 वाजता पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी तात्काळ पोहचले. ब्रिज किशोर त्रिवेदी अशी ओळख मृत व्यक्तीचे पटली आहे.( हेही वाचा- यवतमाळ येथे ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी)
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिज किशोर त्रिवेदी हा पंचशील येथील एका घरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सकाळी ब्रिज रस्ता ओलाडून जात होता त्यावेळी भरधाव जेसीबी आली आणि ब्रिज यांला धडक दिली. या भीषण धडकेत तो गंभीर जखमी झाला जमिनीवर कोसळला. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जेसीबी चालकाला अटक केले आहे.
मृत व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिस या प्रकरणी अधिक तपासणी करत आहे. पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. या अपघातानंतर पंचशील परिसरात एकच खळबळ उडाली आहे.