Delhi CM Atishi, BJP candidate Ramesh Bidhuri (फोटो सौजन्य - Edited Iamge)

Kalkaji Election Results 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी (Delhi CM Atishi) यांनी कालकाजी (Kalkaji) येथून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी निवडणुकीत भाजपचे रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांचा पराभव केला आहे. राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांचाही निवडणुकीत पराभव झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीएम आतिशी यांनी सुमारे तीन हजार मतांनी निवडणूक जिंकली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रमेश बिधुरी यांनी मुख्यमंत्री आतिशी यांना कडक टक्कर दिली. एक दोन फेऱ्या अशा होत्या की, त्यावेळी वाटत होते की, आता आतिशी पिछाडीवर पडतील. परंतु, शेवटच्या तीन फेऱ्यांच्या मतमोजणीच्या वेळी, आतिशी यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेवटच्या फेरीत आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून आपचा गड राखला आणि बिधुरी यांचा दारूण पराभव केला. (हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'आप'ला मोठा धक्का! अरविंद केजरीवाल पराभूत; नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रवेश वर्मांनी खुलवलं कमळ)

अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांचा पराभव -

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते निवडणुकीत पराभूत झाले. आम आदमी पक्षाने कालकाजी मतदारसंघातून आतिशी यांनी उमेदवारी दिली होती. तर भाजपने रमेश बिधुरी आणि काँग्रेसने अलका लांबा यांना उमेदवारी देऊन स्पर्धा अधिक चुरशीची केली होती. परंतु काँग्रेस उमेदवाराला येथे फारशी मते मिळाली नाहीत. (हेही वाचा - Delhi Election Result 2025: 'केजरीवाल यांनी माझे ऐकले नाही, त्यांचे लक्ष दारूवर होते...'; दिल्ली निकालांवर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया)

पराभवानंतर मनीष सिसोदिया यांची प्रतिक्रिया -

दरम्यान, आप नेते आणि जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या पराभवानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, जंगपुराच्या लोकांनी खूप प्रेम दिले परंतु, मी 600 मतांनी मागे पडलो. विजयी झालेल्या उमेदवारांचे आम्ही अभिनंदन करतो. आम्हाला आशा आहे की, ते जंगपुराच्या लोकांच्या समस्या सोडवतील.