आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा; संदीप बक्षी घेणार जागा
चंदा कोचर (Photo Credits: PTI)

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोचर यांच्या राजीनाम्यानंतर आयसीआयसीची धुरा कोणाच्या खांद्यावर हा उत्सुकतेचा विषय होता. मात्र, बँक व्यवस्थापणाने कोचर यांचा राजीनामा स्वीकारताच संदीप बक्षी यांची सीईओ म्हणून निवड केली आहे. संदीप बक्षी  मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एग्जिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.बक्षी यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेण. हा कार्यकाळ ३ ऑक्टोबर २०१३पर्यंत असू शकतो.

आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या कथीत आरोपांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, बँकेने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे की, कोचर यांच्या विरोधात सुरु असलेल्या चौकशीचा त्यांच्यावर कोणातही परिणाम होणार नाही. बँकेच्या हिंतसंबंधांना ठेच आणि फायद्याच्या बदल्यात फायदा असे धोरण काही प्रकरणात राबवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, कोचर आणि आयसीसीआय बँकेशी संबंधीत प्रकरणात SEBIसह आरबीआय आणि कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीही या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सीबीआयने मार्चमध्येच कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याविरोधात प्रारंभीक चौकशी (PE) नेमली होती. तसेच, एप्रिलमध्ये कोचर यांचे दीर राजीव कोचर यांची सखोल चौकशी केली होती. आयसीआयसीआय बँक बोर्डाने विसल ब्लोअर अरविंद गुप्ता यांच्या आरोपांनंतर स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले होते.

दरम्यान, चंदा कोचर यांची ज्या प्रकरणामध्ये चौकशी होत आहे त्यात व्हिडिओकॉन ग्रुपला २०१२मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून ३,२५० कोटी रुपये कर्ज देण्याच्या प्रकरणाचाही समावेश आहे. हे कर्ज सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा हिस्सा होता. ज्यात व्हिडिओकॉन ग्रुपने एसबीआयच्या नेतृत्वाखाली २० बँकांकडून घेतले होते. व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणुगोपाल धूत यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी २०१०मध्ये ६४ कोटी रुपये न्यूपावर रीन्यूएबल्स प्रायव्हेट लिमिटेड (NRPL)ला दिले होते. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि त्यांच्या इतर दोन नातेवाईकांच्या मदतीने स्थापन केली होती.

एक असाही आरोप आहे की, चंदा कोचर आणि त्यांचे पती दिपक कोचर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही कर्जाच्या मंजूरीबाबत इतर आर्थिक फायदे मिळाले आहेत. आयसीआयसीआय बँकेकडून लोन मिळाल्यानंतर ६ महन्यानंतर धूत यांनी दीपक कोचर यांच्या एका ट्रस्टला ९ लाख रुपये ट्रान्स्फर केले होते.