एटीएम मशीन, ग्रामीण भारत Photo Credit : WikiCommons

देशातील सुमारे 50 % ATM मार्च 2019 पर्यत बंद होणार असल्याचे संकेत कंफेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (CATMi) च्या एका अहवालातून मिळाले आहेत. देशभरात हजारोंच्या संख्येत असलेल्या ATM मशिन्स सांभाळणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं नसल्याचे पुढे आले आहे. परिणामी मार्च 2019 पर्यंत सुमारे 1 लाख 13 हजार ATMs ला टाळं लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये एक लाख ऑफ साईट आणि पंधरा हजाराहून अधिक व्हाईट लेबल एटीम आहेत.

CATMi ने दिलेल्या माहितीनुसार,जी ATMs बंद होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागांचा समावेश आहे. परिणामी ग्रामीण भागात जनधन योजने अंतर्गत होणाऱ्या मोठ्या उलाढालींना फटका बसण्याची शक्यता आहे . याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे.

ATM कंपनियांना नेमका का घ्यावा लागतो ATM बंद करण्याचा निर्णय ?

CATMi च्या मते, नव्या नोटा चलनात आल्यानंतर त्यांच्यानुसार सतत मशीनमध्ये बदल करावे लागतात. त्यासाठी कंपनीला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर वर सतत खर्च करावा लागतो. या (रीकेलिब्रेशन) प्रक्रियेवर होणारा सततचा खर्च आर्थिक फटाक्याचा आहे. त्यामुळे काही ATM बंद कारणंच हिताचं आहे. नोटाबंदीनंतर जशा नव्या 500 आणि 1000 च्या नोटा ATM मधून येताना व्यत्यय येत होता तशाच आता नव्या 200 आणि 100 च्या नोटांसाठी ATM मध्ये बदल करावे लागत आहे.

यासोबतच कॅश मॅनेजमेंट, कॅश लोडींग आणि इतर सुविधांसाठी करावे लागणारे बदल यामुळे ग्रामीण भागात ATM सांभाळणं कठीण होऊन बसलं आहे.