Amit Shah| Photo Credits: Twitter /ANI

कोरोना विषाणूने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी आणि बारावीच्या (10th & 12th Exam) काही विषयांचा परीक्षा होऊ शकला नाहीत. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासाठी लॉकडाऊन मध्ये संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार आहेत. तसेच मास्क घालून, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत परीक्षा घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूचे प्रादुर्भाव पाहता देशात 25 मार्च पासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, सुरु असलेल्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांचा परिक्षा थांबवण्यात आल्या होत्या होत्या. मात्र, दाहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले होते. कोरोना विषाणूमुळे रखलेल्या दहावी, बारावीच्या परिक्षांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सविस्तर चर्चा केली आहे. दहावी आणि बारावीच्या परिक्षेला मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले आहेत. त्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासाठी लॉकडाउनमध्ये संचारबंदीचे नियम शिथिल केले जाणार, अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे. तसेच या परीक्षा दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाणार आहे. हे देखील वाचा- कानठळ्या बसवण्याऱ्या आवाजाने हादरले बेंगळूरू; भूकंप झाली की विमान उडाले? पोलिसांचा तपास सुरु

एएनआयचे ट्वीट-

कोरोनाचा वाढता संसर्गामुळे दहावी आणि बारावी या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्ये अनेक अडचणी येत आहेत. परिणामी, या वर्षीचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर, दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागेल, अशी माहिती शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.