Bengaluru (Photo Credits: Bengaluru/ Facebook)

देशात सध्या कोरोना विषाणूचे (Corionavirus) संकट आहे, दुसरीकडे, पूर्वेकडील राज्यांत चक्रीवादळाचा धोका उद्भवला आहे. अशात कर्नाटकमधील पूर्व बेंगलुरू (Eastern Bengaluru) मधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. बंगळुरुमध्ये बुधवारी दुपारी एक विचित्र असा मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज इतका मोठा होता की, यामुळे संपूर्ण शहर हादरून गेले. हा आवाज भूकंपाचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार हा आवाज सुमारे पाच सेकंदापर्यंत ऐकू आला. व्हाईटफिल्ड डिव्हिजनचे डीसीपी एम एन अनुचेथ (M N Anucheth) यांनी सांगितले की, हा आवाज नक्की कुठून आला याचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे.

एएनआय ट्वीट -

याबाबत बोलताना, काही रहिवासी म्हणाले की, या आवाजामुळे त्यांचे दरवाजे आणि काचेच्या खिडक्याही हलू लागल्या. असे वाटत होते की ते आता तुटणार आहेत. तर कित्येकजण म्हणाले की, हा ध्वनी मिरज 2000 या विमानाचा होता, जे त्यावेळी शहरातून उडत होते. मात्र या आवाजामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित हानी झाली नाही. कर्नाटक स्टेट डिझास्टर मॉनिटरिंग सेन्टरने दिलेल्या निवेदनात, हा  कोणत्याही भूकंपांचा आवाज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनीखाली कोणतीही कंपने जाणवली नाहीत. (हेही वाचा: OLA च्या 1400 कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा मोठा निर्णय)

 

Amphan Cyclone: अम्फान चक्रिवादळाचा वेग वाढला; किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवलं - Watch Video 

बंगळुरूचे पोलिस आयुक्त भास्कर राव म्हणतात की, हा आवाज सुमारे एक तासापूर्वी आला होता, व कोठून आला हे कोणालाही माहिती नाही. हा आवाज सुमारे 21 किमी पर्यंत ऐकला गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमानतळ, कल्याण नगर, एमजी रोड, मराठहल्ली, व्हाइटफील्ड, सर्जापूर, इलेक्ट्रॉनिक शहर ते हेब्बागौडीपर्यंत हा रहस्यमय आवाज एकू आला. एअरफोर्स कंट्रोल रूमलाही हा आवाज एखाद्या उड्डाणा आहे किंवा सुपरसोनिक ध्वनी पासून आला आहे की नाही ते तपासण्यास सांगितले आहे.