कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशभरावर आर्थिक संकट ओढवले आहे. लॉक डाऊन (Lockdown) काळात अनेक व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्याने कंपन्या अक्षरशः डबघाईला आल्या आहेत. परिणामी आर्थिक संतुलन टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यापासून ते कर्मचारी संख्या कमी करण्यापर्यंत शक्य ते सर्व पर्याय अवलंबले जात आहेत. असाच एक मोठा निर्णय ओला (OLA) तर्फे घेण्यात आला आहे. ओला कंपनीच्या तब्बल 1400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येणार आहे. लॉक डाऊन काळात मंदावलेला व्यापार पाहता कंपनीच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत ओलचे सीईओ भाविष अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना पत्रातून माहिती दिली. Coronavirus: ओला कंपनीची आता मुंबई महापालिका सोबत भागीदारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मदत करणार
प्राप्त माहितीनुसार,मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉक डाऊन मध्ये ओला चा नफा हा 95 % कमी झाला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांचे वेतन देणे सुद्धा कठीण होत आहे. येत्या काळात सुद्धा कोरोनाचे संकट नेमके कधी संपेल याबाबत अंदाज लावता येणार नाही. अशावेळी नाईलाजाने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे. असे अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या स्पष्टीकरणात म्हंटले आहे. Coronavirus: ओला चे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल पुढील वर्षभराचे संपूर्ण वेतन Ola वाहनचालकांना देणार
PTI ट्विट
Ola to layoff 1,400 staff as COVID-19 pandemic hits revenues, says CEO note to employees
— Press Trust of India (@PTI_News) May 20, 2020
लॉक डाऊन 4 मध्ये काही भागात ओला आणि उबर सहित टॅक्सी सेवा सुरु करण्यात आल्या आहे . बंगळुरू, म्हैसूर, मंगलोर, हुबळी-धारवाड , कर्नाटक या भागात ओला ची सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र रेड झोन मध्ये या सेवांना बंद ठेवले गेले आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार, केवळ दोन प्रवाशांना टॅक्सीमध्ये एकत्र प्रवास करण्याची परवानगी आहे.