Bihar: मित्रांसोबत सेक्स करण्यास नकार देणाऱ्या पत्नीवर ब्लेडने हल्ला, पती विरोधात गुन्हा दाखल
Crime | (Photo Credits: PixaBay)

देशात महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना बिहारच्या (Bihar) नालंदा जिल्ह्यातून (Nalanda) धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी विरोध केला म्हणून एका डॉक्टर पतीने त्याच्या पत्नीवर ब्लेडने (Blade Aattack) हल्ला केला आहे. यात पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नालंदा येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना नालंदा जिल्ह्यातील सोहसराय गावात शुक्रवारी घडली आहे. पोलिसांनी याबाबत शनिवारी माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताचे 2006 मध्ये आरोपीशी लग्न झाले होते. आरोपी हा बिहारच्या गया येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांना 13 वर्षाची मुलगी आणि 11 वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान, आरोपी आपल्या मित्रांना घरी आमंत्रित करायचा. तसेच पीडिताला त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास दबाव टाकायचा. मात्र, पीडिताने नकार देताच तो तिला मारहाण करायचा, असे पीडिताने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच आरोपीचे एका तरूणीसोबत विवाहबाह्य संबंध सुरु असल्याची माहिती पीडिताला मिळाली होती. यामुळे तिला बदनाम करण्यासाठी आरोपी त्याच्या मित्रासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करायचा, असेही पीडिताने म्हटले आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून पीडिता आणि आरोपी यांच्यात शुक्रवारी वाद झाला. यातूनच आरोपीने पीडितावर ब्लेडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात पीडिताच्या छातीवर आणि हातावर वार झाले आहेत. तिला नालंदा जिल्ह्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- बायकोला माहेरी घेऊन गेलेल्या पतीची पूर्व प्रियकराकडून हत्या; अकोला येथील धक्कादायक प्रकार

तर, दुसरीकडे पीडिताच्या सासऱ्याने तिच्या भावाविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडिताच्या भावाने त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी संजय कुमार यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधात आयपीसी कलम अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाखाली एफआयआर नोंदवला आहे. पीडितेच्या छातीवर आणि हातावर वार करण्यात आले. तसेच पोलिसांना पीडिताच्या सासरच्यांकडून तक्रारही मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.