Chief Economic Advisor: भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल
Dr V Anantha Nageswaran (Photo Credit - Twitter)

केंद्र सरकारने (Central Govt) डॉ. व्ही अनंथा नागेश्वरन (Dr V Anantha Nageswaran) यांची मुख्य आर्थिक सल्लागार (Chief Economic Advisor) म्हणून नियुक्ती झालेली आहे. आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. केव्ही सुब्रमण्यम (Krishnamurthy Subramanian) यांचा कार्यकाळ डिसेंबर 2021 मध्ये संपल्यापासून हे पद रिक्त होते. तेव्हापासून या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नव्हती. अशा परिस्थितीत व्ही अनंत नागेश्वरन यांना मोठी जबाबदारी घ्यावी लागणार आहे. भारत ही तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. कोरोना महामारीनंतरही भारताची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली नाही. मात्र, सध्या भारतासमोर बेरोजगारी ही मोठी समस्या बनत आहे. अशा परिस्थितीत यावर मात करण्यासाठी भारत सरकारवर मोठा दबाव आहे. अशा वेळी, नवीन मुख्य आर्थिक सल्लागाराकडून गुंतवणूक पुनरुज्जीवित करताना आणि अर्थसंकल्पातील तफावत भरून काढताना उच्च वाढीसाठी एक उपाय देणे अपेक्षित असणार आहे.

डॉ. व्ही अनंथा नागेश्वरन हे आंध्र प्रदेशातील क्रिया विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्रतिष्ठित अतिथी प्राध्यापक आहेत. त्यांना आर्थिक बाबींचा भरपूर अनुभव आहे. डॉ नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून 1985 मध्ये एमबीए केले. विनिमय दरांच्या अनुभवजन्य वर्तनावर केलेल्या कामासाठी त्यांना मॅसॅच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठाकडून वित्त विषयात डॉक्टरेट उपाधी देण्यात आली आहे.

Tweet

डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांनी सिंगापूर स्थित बँक ज्युलियस बेअर अँड कंपनीचे जागतिक मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून काम केले आहे. डॉ व्ही अनंत नागेश्वरन ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2019 पर्यंत IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आहेत. त्यानंतर 2021 पर्यंत त्यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे पार्ट-टाईम सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (हे ही वाचा Budget Session 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात सोनिया गांधी यांची रणनीती बैठक, मोदी सरकारला घेरण्याचा निर्णय)

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून 

अर्थसंकल्पापूर्वी, डॉ व्ही अनंत नागेश्वरन यांची मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशा स्थितीत यावेळचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना कसा दिलासा देतो, हे पाहावे लागेल. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच 1 फेब्रुवारीला संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर अधिवेशनाचा दुसरा टप्पा 14 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.