Jammu kashmir Update: टार्गेट किलिंगचे अजुन एक प्रकरण उघडकिस, पुलवामामध्ये उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या
Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी (Terrorists) आणखी एक हत्या केली आहे.  यावेळी पुलवामामध्ये (Pulwama) एका उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी घरात घुसून हे हत्याकांड घडवून आणले.  उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले, जे घरात उपस्थित होते. घरातून त्याचं अपहरण करून जवळच्या शेतात नेऊन गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे. दोन ते तीन दहशतवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणले.  मिळालेल्या माहितीनुसार, सब इन्स्पेक्टर फारुख अहमद मीर आयआरपीच्या 23 व्या बटालियनचे होते आणि सध्या ते सीटीसी लेठीपोरा येथे तैनात होते.

या घटनेमागे कोणती संघटना आहे, हे सध्यातरी कळू शकलेले नाही. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना ज्या पद्धतीने घडली त्यामुळे पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची चिंता वाढली आहे. हेही वाचा PM Narendra Modi यांनी आई Heeraben Modi यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त गांधीनगरच्या घरी घेतली भेट (Watch Pics)

कारण गेल्या एका महिन्यात दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे अनेक नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे ही प्रक्रिया काही दिवस थांबली होती, मात्र आता एका उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर पोलिस आणि लष्करासमोरील आव्हान आणखी वाढले आहे.