अमित शाह यांचा कार्यकाळ संपला; जेपी नड्डा होणार BJP चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, 19 फेब्रुवारीला घोषणा होण्याची शक्यता
JP Nadda (Photo Credits: IANS)

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांचा कार्यकाळ जानेवारीतच संपला आहे. लोकसभा निवडणूकीमुळे शाह यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. सार्वत्रिक निवडणुकानंतर आणि शाह यांनी गृहमंत्री म्हणून मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर, जेपी नड्डा (JP Nadda) यांना भाजपचा कार्यवाहू अध्यक्ष बनविण्यात आले. आता अमित शाह यांच्यानंतर जेपी नड्डा हे पक्षाचे पुढचे अध्यक्ष (BJP President) असतील अशी चर्चा आहे. ते फेब्रुवारी महिन्यात पक्षाची सत्ता हाती घेऊ शकतात. जेपी नड्डा यांना 19 किंवा 20 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात येईल.

19  फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेशांच्या निवडणुका पूर्ण होतील आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक होईल. सूत्रांच्या माहितीनुसार जेपी नड्डा हे पक्षाचे अकरावे अध्यक्ष होणार आहेत. सध्या भाजपमध्ये संघटना निवडणुका सुरू आहेत. यानंतर, नड्डा पुढील तीन वर्षे जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील. राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी लागणार्‍या अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया 18 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल.

(हेही वाचा: 'सुधारित नागरिकत्व कायदा' हा नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर 'नागरिकत्व' देणारा कायदा - पंतप्रधान नरेंद्र मोदी)

दरम्यान, जेपी नड्डा हे विद्यार्थी दशेत असल्यापासून राजकारणामध्ये एबीव्हीपीशी जोडे गेलेले होते आणि 1993 मध्ये पहिल्यांदा ते हिमाचल प्रदेशचे आमदार म्हणून संघटनेत विविध पदे सांभाळताना ते निवडून आले होते. त्यानंतर ते राज्य व केंद्रात मंत्रीही राहिले आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात जेपी नड्डा यांनी आरोग्यमंत्री म्हणून 50 कोटी गरिबांसाठी, वर्षाकाठी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांसाठी आयुष्मान भारत सारख्या महत्वाकांक्षी योजना यशस्वीरित्या राबविल्या आहेत. तरी यांना अजून मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते, मात्र आता ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील हे जवळपास निश्चित झाले आहे.