'सुधारित नागरिकत्व कायदा' हा नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर 'नागरिकत्व' देणारा कायदा - पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi at Belur Math (PC - ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज कोलकाताजवळील बेलूर मठाला (Belur Math) भेट देऊन स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी उपस्थित युवा वर्गाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सविस्तर भाष्य केलं. नागरिकत्व कायदा हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा कायदा असल्याचे मोदींनी स्पष्ट केलं आहे. जे महात्मा गांधींनी म्हटलं होतं, तेच मी करत आहे. परंतु, राजकारण करणारे काही लोक हे समजू इच्छित नाहीत, असंही मोदी म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायदा ही या कायद्यातील केवळ एक दुरुस्ती आहे. यात येवढी स्पष्टता असतानाही काही लोक सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन जनतेत भ्रम पसरवत आहेत. मात्र मला आनंद आहे की, आजचा युवक अशा लोकांचा संभ्रम दूर करत आहेत. (हेही वाचा - जम्मू-कश्मीर: कुलगाम येथे हिजबुल आणि लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला ठोकल्या बेड्या)

नागरिकत्व कायदा हा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे. भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये राहिलेल्या अल्पसंख्याकांचा धर्माच्या आधारावर छळ करण्यात येत आहे. या अल्पसंख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, अशी महात्मा गांधी यांचीही इच्छा होती. ही इच्छा मी पूर्ण करत आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.