जम्मू-कश्मीर: कुलगाम येथे हिजबुल आणि लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह पोलीस उपअधीक्षकाला ठोकल्या बेड्या
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

जम्मू-कश्मीर मधील कुलगाम येथे चेकिंग दरम्यान दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आले आहे. या दोन दहशतवाद्यांसह एका उपअधीक्षकाला सुद्धा बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दविंदर सिंह असे उपअधीक्षकाचे नाव असून तो दहशतवाद्यांच्या गाडीसोबत जात असताना पकडला गेला आहे. सिंहला सध्या एअरपोर्ट येथे तैनात करण्यात आले होते. या पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर सुरक्षाबलाकडून छापेमारी सुद्धा करण्यात आली आहे.

सुरक्षाबलांकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा संघटनेचा टॉप कमांडर नवीद बाबू याचा समावेश आहे. तर दुसरा दहशतवादी हिजबुल मुजाहद्दिन संघटनेशी संबंधित असू अल्ताफ असे त्याचे नाव आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, दोन्ही दहशतवादी एका फळविक्रेत्याला धमकावर असल्याचे व्हिडिओतून समोर आले. तर नवीद बाबू काही वर्षांपूर्वी पोलीस कॉनस्टेबल होता. त्याने चार AK-47 रायफल घेऊन पळाला होता. त्यानंतर नवीद याने दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहद्दिन संघटनेसोबत हातमिळवणी केली. या दोघांच्या व्यतिरिक्त एका अजून दहशतवाद्याला अटक केली असून त्याचा संबंध जम्मू-कश्मीर मधील शोपिया येथील आहे.(दिल्लीत ISIS च्या 3 दहशतवाद्यांना अटक, 26 जानेवारीला हल्ला करण्याचा रचला होता कट)

असे सांगितले जात आहे की, ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस उपअधीक्षक हा दहशतवाद्यांसोबत मिळालेला आहे. या तीन दहशतवाद्यांना एका गाडीतून पोलीस उपअधीक्षकासोबत जाताना पकडले गेले. तर डीसीपी रॅंकिंगचा अधिकारी दहशतवाद्यांसोबत या पद्धतीने पकडला गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. अद्याप ताब्यात घेण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांची अधिक तपासणी करण्यात येत आहे.