दिल्लीत ISIS च्या 3 दहशतवाद्यांना अटक, 26 जानेवारीला हल्ला करण्याचा रचला होता कट
प्रतिकात्मक फोटो ( फोटो क्रेडिट- ANI )

देशाची राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनावेळी मोठ्या हल्ल्याचा कट दहशतवाद्यांकडून रचण्यात आला होता. मात्र हा कट दिल्ली पोलिसांनी उधळून काढला असून आयसीआयसीएसच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पोलिसांच्या स्पेशल सेलकडून करण्यात आली आहे. चकमकीत एन्काउंटर करताना तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

26 जानेवारीला दहशतवादी मोठ्या हल्ल्याची तयारी करत होचे. या प्रकरणी पोलिसांच्या गुप्तघेरांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला. त्यानंतर संपूर्ण दिल्ली येथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्यानंतर स्पेशल सेलने कारवाई करत तिघांना घेरले. अटक करण्यात आलेले दहशतवादी तमिळनाडू येथे राहणारे आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी हल्ला घडवून आणल्याचे समोर आले आहे. या तिघांनी 2014 मध्ये एका हिंदू नेत्याची हत्या सुद्धा केली होती. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तर दहशतवाद्यांची इच्छा नक्की काय होती याबाबत कळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.(जम्मू-कश्मीर: लष्कर-ए-तोयबा संघटनेचा कुख्यात दहशतवादी निसार अहमद डार याला अटक)

ANI Tweet:

गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात सुद्धा दिल्ली पोलिसांनी आयएसएसच्या तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. त्या तिघांना गोपालपाडा येथून अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या मते दहशतवादी लोकल जत्रेत IED ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत होते. त्यानंतर दिल्ली त्यांच्या निशाण्यावर होती.दहशतवाद्यांकडून एक IED, 1 किलो विस्फोटक आणि 2 विशेष पद्धतीचे चाकू मिळाल्यानंतर जप्त करण्यात आले आहेत.