Tomato (संग्रहित संपादित प्रतिमा)

Tomato Price: पाऊस लांबणीवर गेल्यामुळे टोमॅटोची किंमत वाढली. देशभरात टोमॅटोची किंमत गगनाला भिडली आहे. सद्या मागणी वाढून पुरवठा कमी झाल्यामुळे टोमॅटोची किंमत वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. काही दिवसांपुर्वी टोमॅटो १०० रुपये प्रति किलो होता तर आता या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. पुन्हा किचनवर परिणाम दिसून येणार आहे. देशातील राजधानी दिल्लीत काही ठिकाणी 200 रुपये प्रति किलो टोमॅटोची किंमत मोजावी लागत आहे. देशातील उत्पादक राज्यात अतिवृष्टीमुळे टोमॅटो पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात  काही ठिकाणी 170 रुपाये द्यावे लागत आहे. दिल्लीत काही दिवसांपुर्वी टोमॅटोचे दर कमी होत होत्या परंतू पुरवठ्या कमी असल्यामुळे पुन्हा टोमॅटोची किंमत वाढली.  ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, टोमॅटोची किरकोळ किंमत बुधवारी 203 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली, तर मदर डेअरीच्या सफाल रिटेल आउटलेटवर त्याची किंमत 259 रुपये प्रतिकिलो होती. महाराष्ट्रात देखील ही परिस्थिती होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आशियातील सर्वात मोठ्या फळ आणि भाजीपाला घाऊक बाजार आझादपूरमध्ये काल (2 ऑगस्ट) टोमॅटोचा घाऊक दर दर्जानुसार 170-220 रुपये प्रति किलो होता. आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून टोमॅटोची आवक कमी झाली आहे. लवकरच टोमॅटोच्या पुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. टोमॅटोच्या वाढच्या दरामुळे मॅकडोनाल्डने ही टोमॅटोच्या वापरावर बंदी घातली होती. टोमॅटोचा दर पडवत नसल्यामुळे मॅकडोनाल्ड टोमॅटो वापरत नाही. आता वाढत्या टोमॅटोच्या किंमतीमुळे गृहीणींने टोमॅटोचा वापर कमी केला आहे.