काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यभरात (Maharashtra) पुन्हा पावसाने कमबॅक (Come Back) केलं आहे. कोकणासह (Konkan) मध्य महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटींग बघायला मिळत आहे तरी हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह (Mumbai) उपनगरात पावसाची रिमझिम सुरुवात झाली आहे. तसेच कोकणातील विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील 4 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानाचा अंदाज (Weather Forecast) बघता प्रशासनाकडून विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस म्हणजे 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट (august) दरम्यान रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), पुणे (Pune), सातारा (Satara) या भागात रेड अलर्ट (Red Alert) तर कोल्हापूर (Kolhapur), सिंधूदुर्ग (Sindhudurg) आणि मुंबईसह उपनगरात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भात (Vidarbh) देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक(Nashik), परभणी (Parbhani), भंडारा (Bhandara), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded), अकोला(Akola), अमरावती(Amaravati), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), बुलढाणा (Budhana), वाशिम (Washim), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) आणि यवतमाळ (Yavatmal) या भागात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Mumbai Darshan: आता फक्त 150 रुपयांत करा संपूर्ण मुंबई दर्शन, बेस्टची मोठी घोषणा)
हवामान विभागाकडून (India Metrological Department) देण्यात आलेल्या माहितीनुसार आज राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नदीकाठच्या गावांना विशेष सुचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर कोकणातील काही भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.