Bulandshahr Accident PC TW

Bulandshahr Accident Video: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे भीषण अपघात झाला आहे. दोन बहिणी रस्त्यावरून जात असताना एका कारने भरधाव वेगात येऊन दोघीना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघी काही फूट अंतरावर उडाला. ही घटना जवळच लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली  आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा-  अटल सेतू वर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या महिलेला कॅब चालकाकडून जीवनदान; नेटकर्‍यांनी केला त्याच्या 'समयसूचकते' वरून कौतुकाचा वर्षाव)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील न्यायालयात हजर झाल्यानंतर ही घटना घडली. कोर्टात हजर झाल्यानंतर दोघींना मारून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. रस्त्यावरू घरच्या दिशेने जात असताना, भरधाव कारने त्यांना मागून धडक दिली. हा अपघात भीषण होता. अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली.

कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणींना न्यायालयात हजर होण्यापूर्वी पती आणि मेहुण्याकडून धमकी आल्या होता. या घटनेनंचक जखमी बहिणींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

समीन असं मोठ्या बहिणीचे नाव आहे. काही वर्षांपूर्वीच तीचं लग्न झालं होतं परंतु तीचं तिच्या नवऱ्याच्या सततच्या भांडणामुळे नवऱ्यापासून विभक्त राहत होती. कोर्टात ती घटस्फोटासाठी गेली असवी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तीला पती आणि सासरच्या कुटुंबाकडून धमकी येत होती. पोलिस या प्रकरणी पुढील शोध घेत आहे. आरोपी कार चालकाल लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.