राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) मलेरिया, टीबीसह 21 औषधांच्या किंमतीमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे रुग्णांना हे औषधे खरेदी महागात पडणार आहे. एनपीपीएने वाढवलेल्या औषधांची यादी सरकारच्या जीवनावश्यक औषधांच्या (Essential medicine) यादीतील आहेत. संबंधित औषधांचे दर वाढवण्याचा निर्णय एनपीपीएने घेतला आहे. त्यानुसार, एनपीपीएने 21 औषधांच्या किंमती 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. औषधाच्या किंमती ठरवण्याचे संपूर्ण अधिकार एनपीपीएला असतात.
एनपीपीए रुग्णांना कमी किंमतीत औषधे उपलब्ध करून देण्यासाठी औषधांचे दर ठरवत असते. परंतु, एनपीपीएलने केलेल्या दरवाढीमुळे रुग्णांच्या खिशाला कात्री लागणार आहे. औषधांची उत्पादन किंमत तसेच मूळ घटकद्रव्यांमध्ये वाढ झाल्याने औषध निर्मिती कंपन्यांनी औषधांच्या किंमतीत वाढ करावी, अशी मागणी एनपीपीएकडे केली होती. तसेच औषध उत्पादन परवडत नसल्याने बाजारामध्ये औषधांचा तुटवडा होऊ लागला होता. औषधांचा तुटवडा निर्माण झाल्यास रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागले असते. त्यामुळे औषधांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे एनपीपीएने सांगितले आहे. (हेही वाचा - Nobel Prize 2019 Physiology And Medicine Winner: कॅन्सर ,ऍनिमिया वरील औषधांशी संबंधित शोधासाठी William G Kaelin Jr, Sir Peter J Ratcliffe , Gregg L Semenza यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान)
या औषधांच्या किंमतीत होणार वाढ -
BCG Vaccine– टीबी तसेच कर्करोगावरील औषध
Benzathine benzylpenicillin– Antibiotic– बॅक्टीरियल संसर्गावरील उपचारासाठी
Chloroquine– मलेरियावरील उपचारासाठी
Dapsone– त्वचावरील उपचारासाठी
Furosemide – सूज, उच्च रक्तदाबावरील उपचारासाठी
Metronidazole- Antibiotic - संसर्गावरील उपचारासाठी
8. Pheniramine– एलर्जी
9. Prednisolone– steroid– lupus, ulcerative colitis - एलर्जीवरील उपचारासाठी.
10. Clofazimine– कुष्ठरोगावरील उपचारासाठी
निती आयोगाने नोव्हेंबर महिन्यात काही औषधांच्या किंमती वाढवणार असल्याची कल्पना दिली होती. एनपीपीएने वाढवलेल्या औषधांच्या किंमतीमध्ये ऍन्टिबायोटिक औषध, कुष्ठरोग, मलेरिया आणि टीबीच्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे.