Viral Video: उत्तराखंड येथील डेडराडून मध्ये एका 12 वर्षाच्या मुलावर वाघाने हल्ला केल्याची भीषण घटना घडली आहे. मात्र, धाडसी मित्रानी त्याला वाघाच्या तावडीतून वाचवले आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. संध्याकाळी दोघेही मित्र घरातून बाहेर खेळायला गेले होते तेव्हा ही घटना घडली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात दिसत आहे. (हेही वाचा- वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक,)
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील डेहराडूनच्या राजपूर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या कॅनॉल रोडवर ही घटना घडली. संध्याकाळी दोघेही मित्र नदीकाठी खेळायला गेले होते. परतण्याच्या वेळेत एकावर वाघाने हल्ला केला. वाघाने निखिलवर हल्ला केल्याचे दिसल्या बरोबर धाडसी मित्राने त्याच्या मित्राला वाघाच्या तावडीतून वाचवले. पीडित मुलगा हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्याला दून रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहितीनुसार, मुलावर उपचार सुरु आहेत. जखमी अवस्थेत रस्त्यावर रडतानाचा पीडित मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
साहसी बच्चों ने अपने मित्र को गुलदार के पंजों से छुड़ा लिया।
ये कोई कहानी नहीं बल्कि देहरादून के राजपुर थाना क्षेत्र में कैनाल रोड पर आज शाम छह बजे के आसपास यह घटी घटना है।
दोस्तों के साथ नदी किनारे खेलकर लौट रहे 12 वर्षीय बच्चे निखिल थापा पर गुलदार ने हमला कर दिया। इससे पहले… pic.twitter.com/buMWzfLPcZ
— Ajit Singh Rathi (@AjitSinghRathi) January 14, 2024
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रक्ताच्या थारोळ्यात उभा असलेला मुलाला पाहून स्थानिकांनी गर्दी केली. मुलाने धाडसी वृत्ती दाखवत मित्राचा जीव वाचवला असल्याने परिसरात सर्वांनाच आर्श्चय वाटत आहे.