Tiger Fight Video: वाघाला भिडला वाघ, झुंज दोन वाघांची; डरकाळी सोबत नैसर्गिक संघर्षाची जबरदस्त झलक, पाहा व्हिडिओ
Tiger Fight Video | (Photo Credits: Twitter)

एका जंगलात दोन वाघ समांतर अंतरावरुन जात असताना अचानक एकमेकांच्या जवळ आले आणि थेट भिडले (Tiger Fight). मानवी समाजाला दिसणाऱ्या जंगलातील नैसर्गिक संघर्षाचा ( Natural Struggle Of Tiger) अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच उत्कंटावर्ध, नाट्यपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. भारतीय वनसेवा ( Indian Forest Service) अधिकारी परवीन कसवान ( Parveen Kaswan) यांनी हा व्हिडि ट्विटरवर शेअर केला आहे. वाघांच्या झुंजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Tiger Fight Viral Video) झाला आहे.

भारतीय वनसेवा अधिकारी परवीन कसवान (Indian Forest Service officer Parveen Kaswan) यांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, फक्त भारतातच. अशा उत्तम गोष्टी पाहाल. व्हॉट्सअॅप द्वारे प्राप्त झालेला व्हिडीओ, असे म्हणत त्यांनी 'Clash of The Titans' असे नावही या व्हिडिओला दिले आहे.

दरम्यान, दोन वाघांचा एकमेकांसोबतच्या या झुंजीचा व्हिडिओ नेमका कोणत्या देशातील अथवा जंगलातील आहे याची पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, हा व्हिडिओ कोणत्यातरी जंगलातील असावा असे दिसते. व्हिडिओत काही वाहनांचा आणि लोकांचा हिंदी भाषेत बोलल्याचा आवाजही ऐकायला येतो. लोकांच्या आवाजावरुन हे लोक भारतीय आहेत असा अंदाज येतो. (हेही वाचा, बापरे! भरदिवसा चक्क घरात घुसला वाघ; विश्वास न ठेवता येण्यासारखी घटना कॅमेऱ्यात कैद (Watch Viral Video))

केवळ काही सेंकदच पाहायला मिळत असलेला हा थरार अंगावर रोमांच उभे करणारा आहे. दोन वाघ एकमेकांना भिडतात. त्यांच्यात जोरदार झुंज होते. अखेर दोन्हीपैकी एक वाघ माघार घेतो. दोघांमधील भाडण संपते. दोघेही आपापल्या मार्गाने निघून जातात. आतापर्यंत अनेक युजर्सनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.