Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 5 वर्षीय बालकाचा काकडी खावून मृत्यू झाला. इतर दोन मुलांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर आणखी दोन सदस्यांना काकडी खाल्याने विषबाधा झाली आहे. त्यांच्यावर सद्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. वैद्यकिय महाविद्यालयात सर्वांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा- Kalwa Sahyadri School च्या 38 विद्यार्थ्यांना खिचडी मधून विषबाधा; मुलांची स्थिती स्थिर)
मिळालेल्या माहितीनुसार, रतलाम येथील एका कुटुंबीयांनी मंगळवारी रात्री बालम काकडी खाली. त्यांनंतर कुटुंबियातील सात सदस्यांना उलट्या आणि मळमळ होऊ लागले. त्यानंतर दोन मुली, एक महिला आणि एका ५ वर्षाच्या मुलाला तातडीने वैद्यकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने कुटुंबियांनी रुग्णालयातील व्यवस्थेवर आरोप केला आहे. या प्रकरणी संतापलेल्या कुटुंबियांनी गुरुवारी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. कुटुंबियांनी सांगितले की, मंगळवारी रात्री जेवणासाठी त्यांनी सॅलड बनवले होते. ते खाल्ल्यानंतर पहाटे सर्व सदस्यांना उटली आणि मळमळ होऊ लागले होते. त्यांनी सुरुवातीला प्राथमिक उपचार घेतले पंरतू तरी देखील त्रास कमी होईना, त्यामुळे शासकिय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेले. तेथे ५ वर्षाच्या मुलाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
.