Rajastan Shocker: विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न, भावजयीचा पराक्रम कॅमेऱ्यात कैद
Rajastan Shocker PC TWITETR

Rajastan Shocker: राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोठ्या भावाच्या पत्नीने लहान भावाच्या चिमुकल्या बाळाला विष दिले. ही घटना खोलीत ठेवलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ एनसीएमइंडिया कौन्सिल फॉर मेन अफेयर्सने 23 मे रोजी पोस्ट केला आहे. सुदैवाने आईच्या सतर्कामुळे या घटनेत बाळ वाचले आहे. या घटनेनंतर विष देणाऱ्या महिलेवर कारवाई करण्यात येणार आहे. धक्कादायक म्हणजे, काही वर्षांपूर्वी विष बाधामुळे घरातील दोन चिमुकल्या बाळाचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा- इगतपुरी येथील भावली धरणात 5 जणांचा बुडून मृत्यू; उजनीमध्येही बोट उलटून 4 बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या पत्नीने लहान भावाच्या चिमुकल्या बाळाला विष दिले. ही घटना भद्रोस गावात घडली आहे. कुटुंबाने सांगितले की, विषबाधामुळे या आधी दोन लहान मुलाचा मृत्यू झाला. विषबाधामुळे बाळाला तीन दिवस आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलाच्या आईला ज संशय असल्यामुळे तीने रुममध्ये कॅमेरा ठेवला होता. महिलेच्या सतर्केमुळे बाळाचा जीव वाचला.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिला बेडरुममध्ये शिरते त्यानंतर मुलाच्या तोंडात एक ड्रॉप विष टाकते. हे कृत्य आईला कळल्यावरती मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला तीन दिवस रुग्णालयात ठेवले. पीडित बाळाच्या आईला तिच्या जाऊबाईवर संशय होता त्यामुळे तीने घरात बाळाच्या बेडजवळ कॅमेरा ठेवल होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर व्हायरल होऊ लागला.या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला.